Khadakwasla Dam Water Release: खडकवासला धरणातून उन्हाळी पाणी पूर्णक्षमतेने सोडले; पुणे व परिसरास पुरवठा

धरणसाखळीत १७.९६ टीएमसी पाणी साठा; शेतीसह पुण्यातील नागरिकांसाठी पाण्याची व्यवस्था
Khadakwasla Dam
Khadakwasla DamPudhari
Published on
Updated on

खडकवासला: पुणे शहर व परिसरासह जिल्ह्यातील हजारो हेक्टर शेतीला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला धरणातून शेतीसाठी उन्हाळी आवर्तनाचे पाणी 1103 क्युसेक वेगाने पूर्णक्षमतेने सोडले जात आहे. त्यामुळे गेल्या दहा दिवसांत धरणसाखळीत 0.81 इतकी पाण्याची घट झाली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत धरणसाखळीत 0.76 टीएमसी इतका जादा पाणीसाठा आहे. गेल्या वर्षी आजच्या दिवशी 27 फेबुवारी 2026 रोजी खडकवासला धरणसाखळीत 17.20 टीएमसी म्हणजे 59.00 टक्के इतका पाणीसाठा होता, तर यंदा आजच्या दिवशी 27 फेबुवारी रोजी 17.96 टीएमसी म्हणजे 61.61 टक्के इतका पाणीसाठा आहे.

Khadakwasla Dam
Fake PMPML Mobile App: बनावट पीएमपी ॲपद्वारे आर्थिक फसवणूक; तरुणावर गुन्हा

17 फेबुवारीपासून खडकवासला धरणातून मुठा कालव्यात पूर्णक्षमतेने पाणी सोडण्यात येत आहे. खडकवासलापासून 202 किलोमीटर अंतराच्या मुठा कालव्यातून इंदापूर तालुक्यातील शेवटच्या टोकाला पाणी पोहोचल्याचे खडकवासला धरण जलसंपदा विभागाच्या शाखा अभियंता गिरिजा कल्याणकर यांनी सांगितले.

Khadakwasla Dam
Pune Hill Security System: बोपदेव घाट प्रकरणानंतर ८० कोटींचे सुरक्षाकवच सज्ज; पण ‘स्विच ऑन’ कधी?

हवेली, दौंड, इंदापूर आदी तालुक्यांतील हजारो हेक्टर शेतीला उन्हाळी आवर्तनाचे पाणी सोडण्यात येणार आहे. त्यासाठी खडकवासला धरणातून मुठा कालव्यात पाणी सोडण्यात येत असल्याने मुठा कालवा दुथडी भरून वाहत आहे. याशिवाय पुणे शहर व परिसराला पिण्यासाठी पूर्णक्षमतेने पाणी सोडण्यात येत आहे.

Khadakwasla Dam
Pune Holi Special Trains Rush: होळीमुळे पुणे रेल्वेस्थानकावर प्रवाशांची प्रचंड गर्दी

त्यामुळे धरणसाखळीतील पाणीसाठ्यात घट सुरू आहे. जिल्ह्याच्या पूर्व भागातील शेती तसेच येथील लाखो रहिवाशांसह व पुणे शहर व परिसरास जवळपास एक कोटी नागरिकांची तहान खडकवासला धरणसाखळीतील पानशेत, वरसगाव, खडकवासला व टेमघर या चार धरणांतून भागवली जात आहे. खडकवासला धरणसाखळीतील चार धरणांची एकूण पाणी साठवणक्षमता 29.15 टीएमसी इतकी आहे. रब्बी आवर्तनाचे पाणी 10 फेबुवारी रोजी सोडणे बंद करण्यात आले.

Khadakwasla Dam
Pune Stray Dog Shelters Project: पुण्यात भटक्या श्वानांसाठी 3 हजार क्षमतेची निवारागृहे उभारणी

या कालावधीत 3.77 टीएमसी इतके पाणी सोडले. खडकवासला धरणसाखळीतील टेमघर धरण 33.71 टक्के, वरसगाव धरण 63.65 टक्के, पानशेत धरणात 71.12 टक्के तर खडकवासला धरणात 49.42 टक्के इतका पाणीसाठा आहे. उन्हाळ्यात पिण्यासाठी तसेच शेतीसाठी पुरेशा प्रमाणात पाणीपुरवठा करण्यावर प्रशासनाने लक्ष केंद्रित केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news