Ketan Agarwal Murder Case: केतन अगरवाल हत्या प्रकरणात नवा खुलासा; पहिला प्रयत्न फसल्यानंतर चेतनची थेट एन्ट्री, डिजिटल पुरावेही समोर

पोलिस तपासात धक्कादायक माहिती; कथित कटासाठी गुगल-यूट्यूबवर शोध, पोलिस चौकशीचीही केली होती तयारी
Siya Goel and Chetan Choudhary
Siya Goel and Chetan Choudhary Pudhari
Published on
Updated on

पुणे: केतन अगरवालच्या खुनाचे विविध पर्याय पडताळून पाहिल्यानंतर लोहगडावरून ढकलून त्याचा खून करायचा यावर सिया आणि चेतन या दोघांत एकमत झाले. मात्र, सुरुवातीला एकटी सियाच केतनला गडावरून दरीत ढकलून देणार होती. परंतु, १४ जून रोजीच्या प्रयत्नात तिला यश आले नाही. त्यामुळे ती मानसिक तणावात गेली. नंतर दोघांची याबाबत चर्चा झाली. तेव्‍हा चेतन म्हणाला 'तुला जमणार नाही, आता हे काम मलाच करावे लागेल' अशा पद्धतीने पडद्यामागून केतनच्या खुनाची तयारी करणाऱ्या चेतनची प्रत्यक्ष 'एन्ट्री' झाल्याचे पोलिस सूत्रांनी सांगितले.

Siya Goel and Chetan Choudhary
Ketan Agarwal Murder Case: केतन अगरवाल हत्या प्रकरणात धक्कादायक खुलासा; लोहगडावर ढकलण्यापूर्वी रंगीत तालीम, गुगल-यूट्यूबवर शोध

आत्तापर्यंत पोलिसांच्या तपासातील माहितीनुसार, लग्न मोडता येत नाही हे लक्षात आल्यानंतर १५ मेपासूनच सिया आणि चेतन या दोघांनी केतनला कायमचे आपल्या वाटेतून कसे दूर करता येईल, याची तायरी सुरू केली होती. ३१ मेअगोदर लोहगडाची कल्पना या दोघांच्या डोक्यात आली. १४ जूनला केतनचा खून करण्याचे दोघांनी ठरवले. ठरल्याप्रमाणे सिया केतनला लोहगडावरील त्या ठिकाणी घेऊन गेली होती. तिने केतनला दरीत ढकलून देण्यासाठी धक्कादेखील मारला. पण तो काही तिच्या धक्क्याने पडला नाही.

Siya Goel and Chetan Choudhary
Savitribai Phule Pune University: सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात एम.एस्सी. व्हायरॉलॉजी अभ्यासक्रम; तृतीयपंथीय विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण

त्याने स्वतःला सावरले. या वेळी सिया हिने साप-साप म्हणून ओरडत वेळ मारून नेली. त्यामुळे केतन याला काही संशय आला नाही. सियाने चेतनला सांगितले हे काही आपल्याला जमत नाही. यामुळे सिया मानसिक तणावात गेली होती. याबाबत दोघामध्ये चर्चा झाली. शेवटी चेतन म्हणाला 'तुला जमणार नाही, तर आता हे काम मला करावे लागेल'. त्यातूचन पुढे सिया सोबत प्रत्यक्ष चेतन चौधरीही लोहगडावर पोहचला. सिया कंटाळा आल्याचा आणि बुटाची लेस बांधण्याचा बहाणा करून खाली बसताच त्याने केतनला दरीत ढकलून दिले.

Siya Goel and Chetan Choudhary
Pune POCSO Court Verdict: चॉकलेटचे आमिष दाखवून ९ वर्षीय मुलीचा विनयभंग; ६५ वर्षीय वृद्धाला तीन वर्षांची सक्तमजुरी

चेतनने हुडी बदलली

केतन याचा खून करताना सिया आणि चेतन हे दोघे पोलिस आणि किल्ल्यावरील लोकांच्या नजरेत आपण येऊ नयेत म्हणून चांगलीच खबरदारी घेत होते. किल्ल्यावर पोहचताना चेतन याने आपल्या अंगावर हुडी घालून तोंड झाकून घेतले होते. मात्र, जेव्हा तो सिया आणि केतन या दोघांच्या मागे किल्ल्यावर पोहोचला तेव्हा त्याने आपल्या अंगावरील हुडी काढून पाठीवरील सॅकमध्ये ठेवली. खरं तर केतन हा दोनदा व्हिडीओ कॉलवर त्याच्यासोबत सियाचा जवळचा मित्र म्हणून बोलला होता. कदाचित चेतन याने हुडीने तोंड झाकले नसते तर त्याला ओळखले असते. केतन याला दरीत ढकलून दिल्यानंतर चेतन याने परत आपल्य़ा अंगावर हुडी घालून पूर्वीसारखा वेश केला. त्यानंतर काही झालेच नाही, अशा पद्धतीने तो किल्यावरून खाली उतरत लोकांशी बोलत बोलत खाली उतरला. त्यानंतर एका ठिकाणी चहा पिऊन तो घरी परतला.

Siya Goel and Chetan Choudhary
College Professors Technology Skills: काळानुरूप प्राध्यापकांनीही तंत्रज्ञान आत्मसात करावे: शेखर गायकवाड

पोलिसांच्या उत्तराची तयारी, शिक्षाही शोधली

सिया, चेतन या दोघांना माहिती होते की, पोलिस आपल्याकडे केतन याच्या अपघाताच्या अनुषंगाने चौकशी करू शकतात. त्यामुळे दोघांनी अगोदरच पोलिसांच्या प्रश्नांना कशी उत्तरे द्यायची, याची तयारी केली होती. तसेच, हा गुन्हा आपण केला आहे. जर तो उघडकीस आला तर आपल्याला किती शिक्षा होऊ शकते हे देखील गुगलवर सर्च करून पाहिले असल्याचे पोलिसांच्या तपासात समोर आले आहे. केतन याचा खून केल्यानंतर दोघे घरी आल्यानंतर व्हॉटस्‌अपद्वारे एकमेकांच्या संपर्कात होते. दोघामधील संभाषणाचे मेसेज त्यांनी डिलीट केले आहेत. काय मोबाईलमध्ये ठेवायचे आणि काय नाही, याची दोघे खबरदारी घेत होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news