Pune POCSO Court Verdict: चॉकलेटचे आमिष दाखवून ९ वर्षीय मुलीचा विनयभंग; ६५ वर्षीय वृद्धाला तीन वर्षांची सक्तमजुरी

पोक्सो न्यायालयाचा निकाल; पीडितेची निर्भीड साक्ष आणि प्रत्यक्षदर्शीच्या साक्षीवर आरोपी दोषी
POCSO
POCSOPudhari
Published on
Updated on

पुणे: चॉकलेटचे आमिष देत नऊ वर्षीय चिमुकलीला घरात बोलावून तिचा विनयभंग व लैंगिक छळ करणाऱ्या ६५ वर्षीय वृद्धाला विशेष 'पोक्सो' न्यायालयाने तीन वर्षे सक्तमजुरी आणि एक हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली.

POCSO
College Professors Technology Skills: काळानुरूप प्राध्यापकांनीही तंत्रज्ञान आत्मसात करावे: शेखर गायकवाड

विशेष न्यायाधीश रामराजे राजेभोसले यांनी हा निकाल दिला. पीडित मुलीने आरडाओरडा केल्यानंतर शेजारी राहणाऱ्या आरोपीच्या पुतण्याने घरात शिरून आरोपीला कानशिलात लगावली होती. पीडित मुलीने निर्भीडपणे नोंदविलेली साक्ष आणि या घटनेचा प्रत्यक्षदर्शी साक्षीदार ठरलेल्या पुतण्याने दिलेल्या साक्षीच्या आधारे आरोपी दोषी सिद्ध झाला. ही घटना १२ फेब्रुवारी २०२२ रोजी दुपारी साडेतीनच्या सुमारास भोर तालुक्यात घडली. याप्रकरणी ६५ वर्षीय कामगाराविरोधात राजगड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला.

POCSO
Maharashtra Dam Water Storage: राज्यातील धरणांतील पाणीसाठा २२.६८ टक्क्यांवर; २६ धरणे उपयुक्त पाणीसाठ्याविना

पीडित मुलगी शाळेतून घरी परत येताना आरोपीने तिला चॉकलेटचे आमिष दाखवून घरात बोलावले. त्याने स्वतःचे आणि पीडितेचे कपडे काढून तिचा लैंगिक छळ केला. पीडितेने आरडाओरडा केल्यानंतर शेजारी राहणारा आरोपीचा पुतण्या घरात आला.

POCSO
Pune RTO Black Spots: पुण्यातील ३० अपघातप्रवण ब्लॅक स्पॉट्सची विशेष पाहणी; आरटीओकडून अधिकाऱ्यांची नियुक्ती

त्याने आरोपीला कानशिलात लगावून घाबरलेल्या पीडित मुलीची सुटका केली. त्यानंतर स्वतःच्या मोबाईलमध्ये आरोपीची छायाचित्रे काढून पोलिसांकडे पुरावा स्वरूपात दिली. मुलीने घडलेला प्रकार आईला सांगितला. त्यानंतर आईने दिलेल्या तक्रारीच्या आधारे राजगड पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली. या खटल्यात विशेष सरकारी वकील नितीन कोंघे यांनी सात साक्षीदार तपासले. .

POCSO
Pune Waste Management: कचरा व्यवस्थापनासाठी पुण्यात ‘ओडब्ल्यूसी’ तंत्रज्ञानाचा वापर; स्थानिक प्रक्रिया पद्धतीवर भर

त्यामध्ये पीडित मुलगी, तिची आई, प्रत्यक्षदर्शी साक्षीदार असलेला आरोपीचा पुतण्या, वैद्यकीय अधिकारी यांची साक्ष महत्त्वाची ठरली. पीडितेचा जबाब, प्रत्यक्षदर्शीची साक्ष आणि मोबाइलमधील छायाचित्रांच्या आधारे आरोपीचा गुन्हा सिद्ध झाला. दरम्यान, आरोपी मागील चार वर्षांपासून कारागृहात असल्याने हा कालावधी त्याच्या शिक्षेमध्ये वजा केला जाईल, असे न्यायालयाने आदेशात नमूद केले आहे

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news