Keshavnagar Encroachment: महापालिकेची कारवाई संपताच केशवनगरमध्ये अतिक्रमणे पुन्हा 'जैसे थे'; २४ मीटर रस्ता मोकळा करण्याची मागणी

छत्रपती शिवाजी महाराज चौक ते रेणुकामाता मंदिर चौकादरम्यान कारवाई; काही तासांतच पुन्हा अतिक्रमणे, वाहतूक कोंडीचा प्रश्न गंभीर
Keshavnagar Encroachment
Keshavnagar EncroachmentPudhari
Published on: 
Updated on: 

मुंढवा: केशवनगर येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक ते रेणुकामाता मंदिर चौक, तसेच मंत्रा सोसायटी परिसरातील २४ मीटर डीपी रस्त्याच्या फ्रंट मार्जिनमधील अनधिकृत बांधकामांवर शुक्रवारी (ता. २७) महापालिकेच्या बांधकाम विकास विभागाने कारवाई केली. मात्र, कारवाई पथक परतताच सायंकाळपासून पुन्हा अतिक्रमणे उभारण्यास सुरुवात झाली. शनिवारी दुपारपर्यंत अनेक ठिकाणी पुन्हा अतिक्रमणे झाल्याने नागरिकांनी या कारवाईवर प्रश्न उपस्थित केले आहे.

Keshavnagar Encroachment
Pune Children Assemblies: पुण्यात ७०० विद्यार्थ्यांची बालसभा; पदपथ, वाहतूक, प्रदूषण अन् पाण्याच्या प्रश्नांवर अधिकाऱ्यांना जाब

केशवनगरमधील हा २४ मीटर डीपी रस्ता पूर्णपणे अतिक्रमणमुक्त करून वाहतुकीसाठी खुला करावा, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. मात्र, महापालिकेकडून वारंवार जुजबी कारवाई केली जात असल्याने रस्त्याची संपूर्ण रुंदी अद्याप मोकळी झालेली नाही. सध्या सरासरी १४ ते १६ मीटर रस्ताच वाहतुकीसाठी उपलब्ध आहे.

Keshavnagar Encroachment
NDA Women Cadets Silver Medal: एनडीएच्या इतिहासात प्रथमच दोन महिला कॅडेट्सना रौप्यपदक; गार्गी पालीवाल, दिव्या गोदारा यांची ऐतिहासिक कामगिरी

उर्वरित जागेवर अतिक्रमणे कायम आहेत. नदीपात्रातील पूल वाहतुकीसाठी खुला झाल्यानंतर या मार्गावरील वाहनांची संख्या वाढली असून, अतिक्रमणांमुळे वाहतूक कोंडीची समस्या अधिक गंभीर झाली आहे. शुक्रवारच्या कारवाईत संपूर्ण २४ मीटर रस्ता मोकळा करण्याची संधी असतानाही महापालिकेने केवळ फ्रंट मार्जिनमधील काही बांधकामे हटविली.

Keshavnagar Encroachment
Pune Encroachment Removal Drive: पुण्यात अतिक्रमणांवर महापालिकेचा बुलडोझर; एकाच दिवसात ३.५८ लाख चौ. फूट जागा मोकळी

उर्वरित अतिक्रमणांवर कारवाई का केली नाही, असा सवाल नागरिकांनी उपस्थित केला आहे. विशेष म्हणजे, कारवाईनंतर काही तासांतच पुन्हा अतिक्रमणे पुन्हा 'जैसे थे' होत असल्याने महापालिकेच्या मोहिमेचा उपयोग काय, असा सवालही उपस्थित केला जात आहे.

Keshavnagar Encroachment
Pune Metro Last Train Timetable: हिंजवडीकरांसाठी गुड न्यूज! पुणे मेट्रोच्या शेवटच्या फेऱ्यांचे वेळापत्रक जाहीर

फक्त पत्राशेड हटवून प्रश्न सुटणार नाही!

२४ मीटरचा डीपी रस्ता पूर्णपणे मोकळा करणे अपेक्षित असताना काही अतिक्रमणांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष झाल्याची चर्चा आहे. राजकीय हस्तक्षेपामुळे ठोस कारवाई होत नसल्याचा आरोपही नागरिकांनी केला आहे. केवळ पत्राशेड हटवून प्रश्न सुटणार नाही. उर्वरित अतिक्रमणे हटवून संपूर्ण रस्ता वाहतुकीसाठी खुला करावा आणि पुन्हा अतिक्रमणे होणार नाहीत, यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.