NDA Women Cadets Silver Medal: एनडीएच्या इतिहासात प्रथमच दोन महिला कॅडेट्सना रौप्यपदक; गार्गी पालीवाल, दिव्या गोदारा यांची ऐतिहासिक कामगिरी

१५१ व्या पदवीदान समारंभात दोघींनी मिळवला राष्ट्रपतींचा सन्मान; तीन वर्षांचे कठोर प्रशिक्षण पूर्ण करून ३६४ कॅडेट्स सैन्यदलात अधिकारी म्हणून दाखल
NDA Women Cadets Silver Medal
NDA Women Cadets Silver MedalPudhari
Published on: 
Updated on: 

पुणे: राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी (एनडीए)च्या १५१ वा पदवीदान समारंभात यंदा दोन महिला कॅडेट्सने इतिहास रचला. मुलींची बॅच एनडीएमध्ये सुरू झाल्यापासून प्रथमच गार्गी पालीवाल (राजस्थान) आणि दिव्या गोदारा (हरियाणा) दोन मुलींनी रौप्यपदक पटकावण्याची विक्रमी कामगिरी केली आहे. त्यांचे हे अभूतपूर्व यश पाहून आईवडिलांचे डोळे पाणावले होते.

NDA Women Cadets Silver Medal
Pune Encroachment Removal Drive: पुण्यात अतिक्रमणांवर महापालिकेचा बुलडोझर; एकाच दिवसात ३.५८ लाख चौ. फूट जागा मोकळी

पुण्यातील खडकवासला भागातील एनडीएमध्ये शनिवारी १५१ वा पदवीप्रदान सोहळा संपन्न झाला. आजवर मुलींना इथे संधी नव्हती. मात्र, सन २०२२ मध्ये सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे मुलींना एनडीएची कवाडे खुली झाली. यंदा एकूण १४ मुलींची चौथी बॅच येथून तीन वर्षांचे यशस्वी प्रशिक्षण घेऊन भारतीय सैन्यदलात अधिकारी पदावर जाणार आहेत.

NDA Women Cadets Silver Medal
Pune Metro Last Train Timetable: हिंजवडीकरांसाठी गुड न्यूज! पुणे मेट्रोच्या शेवटच्या फेऱ्यांचे वेळापत्रक जाहीर

एनडीएच्या इतिहासात प्रथमच गार्गी पालीवाल आणि दिव्या गोदारा या दोन मुलींना राष्ट्रपतींचे रौप्यपदक मिळाले आहे, तर प्रशांत कुमार आणि आयुष कुमार या दोन मुलांना रौप्यपदक मिळाले. शनिवारी २८ नोव्हेंबर रोजी एनडीएमधून यंदा ३६४ कॅडेट सैन्यदलाच्या विविध शाखेत अधिकारी पदावर गेले. यात १८ विदेशी कॅडेचा समावेश आहे.

NDA Women Cadets Silver Medal
Maharashtra Sahitya Parishad: महाराष्ट्र साहित्य परिषदेत सत्तासंघर्षाचा स्फोट! अविश्वास ठराव मंजूर झाल्याचा दावा; सुनील महाजन नवे अध्यक्ष

बी.एस्सी. ७७, बीए ५८, बी.टेक. १३९,कॉम्प्युटर सायन्स शाखेतील ९५ अशा पदवी प्रदान करण्यात आल्या. डीआरडीओच्या डाएट या लष्करी अभियांत्रिकी महाविद्यालयाचे कुलगुरू डॉ. बी. एच. व्ही. एस. नारायण मूर्ती यांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला. रविवारी २९ रोजी देशाचे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्या प्रमुख उपस्थितीत पहाटे ६ वाजता दीक्षान्त संचलन सोहळा पार पडणार आहे.

NDA Women Cadets Silver Medal
Pune Road Accidents: पुण्यात रस्ते अपघातांचा कहर! दहा महिन्यांत २६३ जणांचा मृत्यू

गार्गीचे तीनही भावंडं सैन्य दलात

गार्गी पालीवाल ही राजस्थान राज्यातील चित्तोडगड येथून येथून एनडीएमध्ये आली. तिला मोठा भाऊ आणि लहान बहीण आहे. भाऊ लष्करात कर्नल पदावर आहे, तर बहीण पुण्यातच सशस्त्र सेना वैद्यकीय महाविद्यालयात एम.बी.बी.एस. करीत आहे. ती म्हणाली, घरातून आम्ही तीनही भावंडं सैन्यदलात आलो, हा खूप माझ्यासाठी खूप रोमांचक क्षण आहे. मी हवाईदलात जाणार आहे. दिव्या गोदारा ही हरियाणा राज्यातील हिस्सार गावातून आली. ती म्हणाली, माझ्यासाठी एनडीए खूप नवीन होते. जेव्हा येथे महिलांना संधी मिळाली, तेव्हा खूप आनंद झाला. त्यामुळे मी दिल्ली येथे प्रशिक्षण घेतले. कारण सैन्य दलात घरातून कुणीही गेले नव्हते. अखेर मी एनडीएमध्ये आले आणि आज माझे स्वप्न पूर्ण झाले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.