

पुणे: रात्री उशिरा प्रवास करणाऱ्यांचा प्रवास अधिक सुरक्षित, सोयीस्कर आणि नियोजनबद्ध व्हावा, यासाठी पुणेरी मेट्रो प्रशासनाने पिंक लाइनवरील जिल्हा न्यायालय ते माण मेट्रोस्थानक यादरम्यानच्या (हिंजवडी-शिवाजीनगर) शेवटच्या मेट्रो गाड्यांचे स्थानकनिहाय वेळापत्रक जाहीर केले आहे. यामुळे आयटी पार्क परिसरात काम करणारे कर्मचारी आणि रात्री उशिरा हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रोने प्रवास करणाऱ्यांंना आपल्या प्रवासाचे अचूक नियोजन करणे शक्य होणार असून, प्रवासाची चिंता मिटणार आहे.
जिल्हा न्यायालय ते माण मार्गिका :
जिल्हा न्यायालय व कृषी महाविद्यालय - रात्री ११:४० वा.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, सकाळनगर व औंध - रात्री ११:४५ वा.
बालेवाडी फाटा - रात्री ११:५० वा.
बालेवाडी हाय स्ट्रीट, आर. के. लक्ष्मण म्युझियम व मिटकॉन बालेवाडी - रात्री ११:५५ वा.
श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल (म्हाळुंगे) व वाकड चौक - मध्यरात्री १२ वा.
हिंजवडी फेज १, छत्रपती शिवाजी महाराज चौक (हिंजवडी) व पद्मभूषण चौक: मध्यरात्री १२:०५ वा.
हिंजवडी फेज २ (सर्कल १ व सर्कल २) - मध्यरात्री १२:१० वा.
माण बस डेपो व माण - एमआयडीसी सर्कल (फेज २) - मध्यरात्री १२:१५ वा.
माण (अंतिम स्थानक) - मध्यरात्री १२:२० वा.
माण ते जिल्हा न्यायालय मार्गिका :
माण, माण- एमआयडीसी सर्कल (फेज २) व माण बस डेपो - रात्री १०:३० वा.
हिंजवडी फेज २ (सर्कल २ व १) व पद्मभूषण चौक - रात्री १०:३५ वा.
छत्रपती शिवाजी महाराज चौक (हिंजवडी) व हिंजवडी फेज १ - रात्री १०:४० वा.
वाकड चौक, श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल (म्हाळुंगे) व मिटकॉन बालेवाडी - रात्री १०:४५ वा.
आर. के. लक्ष्मण म्युझियम, बालेवाडी हाय स्ट्रीट व बालेवाडी फाटा - रात्री १०:५० वा.
औंध - रात्री १०:५५ वा.
सकाळनगर व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ - रात्री ११ वा.
कृषी महाविद्यालय - रात्री ११:०५ वा.
जिल्हा न्यायालय (अंतिम स्थानक) - रात्री ११:१० वा.