Pune Children Assemblies: पुण्यात ७०० विद्यार्थ्यांची बालसभा; पदपथ, वाहतूक, प्रदूषण अन् पाण्याच्या प्रश्नांवर अधिकाऱ्यांना जाब

६० शाळांतील विद्यार्थ्यांचा शहरव्यापी उपक्रमात सहभाग; महापौर मंजूषा नागपुरे यांच्याकडून समस्यांवर कार्यवाही आणि अर्थसंकल्पीय तरतुदींचे आश्वासन
Pune Children Assemblies
Pune Children AssembliesPudhari
Published on: 
Updated on: 

पुणे: शहरविकासाचे नियोजन करताना मोठ्यांचे मत विचारात घेतले जाते; मात्र ज्या शहरात मुले राहतात, खेळतात आणि शिक्षण घेतात, त्या शहराच्या प्रश्नांवर त्यांचे मतही महत्त्वाचे आहे. याच विचारातून पुण्यात प्रथमच शहरव्यापी बालसभांचे आयोजन करण्यात आले. या सभांमध्ये सुमारे ६० शाळांतील ७०० विद्यार्थ्यांनी सहभाग घेत पदपथ, वाहतूक, प्रदूषण, पाणी, कचरा आणि सार्वजनिक स्वच्छतागृहांसह शहरातील विविध नागरी समस्यांचा पाढा अधिकाऱ्यांसमोर वाचला.

Pune Children Assemblies
NDA Women Cadets Silver Medal: एनडीएच्या इतिहासात प्रथमच दोन महिला कॅडेट्सना रौप्यपदक; गार्गी पालीवाल, दिव्या गोदारा यांची ऐतिहासिक कामगिरी

महापालिकेच्या १० प्रभाग कार्यालयांत 'वॉर्ड वॉच : बेहतर पुण्यासाठी युवा मने' या उपक्रमांतर्गत या बालसभा पार पडल्या. पुणे क्लायमेट वॉरिअर आणि स्फूर्ती फाउंडेशन यांच्या पुढाकाराने आयोजित या उपक्रमातून विद्यार्थ्यांना आपल्या परिसरातील समस्या मांडण्याची आणि महापालिका अधिकाऱ्यांशी थेट संवाद साधण्याची संधी मिळाली.

Pune Children Assemblies
Pune Encroachment Removal Drive: पुण्यात अतिक्रमणांवर महापालिकेचा बुलडोझर; एकाच दिवसात ३.५८ लाख चौ. फूट जागा मोकळी

विद्यार्थ्यांनी शाळांपर्यंतचे असुरक्षित रस्ते, अपूर्ण पदपथ, वाहतूक कोंडी, खड्डे, नदी-नाल्यांचे प्रदूषण, झाडांची होणारी कत्तल, अनियमित पाणीपुरवठा आणि कचरा व्यवस्थापनातील त्रुटीकडे लक्ष वेधले. मुलांना सुरक्षित खेळण्यासाठी मोकळ्या जागा, स्वच्छ सार्वजनिक स्वच्छतागृहे आणि नियमित बससेवा देण्याची मागणीही त्यांनी केली.

Pune Children Assemblies
Pune Metro Last Train Timetable: हिंजवडीकरांसाठी गुड न्यूज! पुणे मेट्रोच्या शेवटच्या फेऱ्यांचे वेळापत्रक जाहीर

प्रत्येक शाळेच्या चार विद्यार्थ्यांच्या पथकाने परिसरातील समस्या मांडल्या. कोथरूडमधील पूना स्कूल अँड होम फॉर ब्लाइंड गर्ल्सच्या दृष्टिबाधित विद्यार्थिनींचा सहभाग, हे या उपक्रमाचे विशेष वैशिष्ट्य ठरले. महापौर मंजूषा नागपुरे यांनी विद्यार्थ्यांनी मांडलेल्या समस्यांचा आढावा घेऊन त्या संबंधित प्रभाग कार्यालयांकडे पाठविण्यात येतील तसेच अर्थसंकल्पीय तरतुदींचेही आश्वासन दिले.

Pune Children Assemblies
Maharashtra Sahitya Parishad: महाराष्ट्र साहित्य परिषदेत सत्तासंघर्षाचा स्फोट! अविश्वास ठराव मंजूर झाल्याचा दावा; सुनील महाजन नवे अध्यक्ष

बालसभांचा प्रवास पिंपरी-चिंचवडपर्यंत

पुण्यातील बालसभांनंतर हा उपक्रम पुणे कॅन्टोन्मेंट बोर्ड आणि पिंपरी-चिंचवड महापालिकेतही राबविण्यात येणार आहे. ३० नोव्हेंबरला पुणे कॅन्टोन्मेंट बोर्डात, तर १ डिसेंबरला पिंपरी-चिंचवड महापालिकेत बालसभांचे आयोजन होणार आहे. संयुक्त राष्ट्रांच्या बालहक्कविषयक करारातील कलम १२ नुसार मुलांना स्वतःवर परिणाम करणाऱ्या विषयांवर मत मांडण्याचा अधिकार आहे. बालसभा हा एकदाच होणारा उपक्रम न राहता मुलांच्या नागरी सहभागासाठी सातत्यपूर्ण मंच बनविण्याचा आयोजकांचा प्रयत्न आहे. भविष्यात महापालिकेच्या शाळांतील विद्यार्थ्यांनाही या उपक्रमात सहभागी करून घेण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.