

रामदास डोंबे
खोर: केडगाव (ता. दौंड) परिसरातील दुय्यम निबंधक कार्यालयात मूलभूत सुविधांचा पूर्णतः अभाव असल्याने नागरिक, पक्षकार आणि वकिलांना प्रचंड गैरसोयींना सामोरे जावे लागत आहे. बसण्याची व्यवस्था नाही, स्वच्छतागृह नाही, पिण्याच्या पाण्याची सुविधा नाही, तसेच पार्किंगचा प्रश्न गंभीर बनला असून केडगाव-चौफुला रस्त्यावर वाहनांच्या रांगा लागून वाहतूक कोंडी निर्माण होत असल्याने सर्वसामान्य नागरिक हैराण झाले आहेत.
केडगाव दुय्यम निबंधक कार्यालय सध्या बोरीपार्धी हद्दीत कार्यरत आहे. परंतु येथे जागेची मोठी कमतरता असल्याने कार्यालयाचे कामकाज सुरळीत पार पडत नाही. त्यामुळे हे कार्यालय केडगाव ग््राामपंचायत हद्दीत हलविण्याची मागणी नागरिकांकडून मोठ्या प्रमाणात होत असून केडगाव ग््राामपंचायत देखील आवश्यक जागा व पायाभूत सुविधा देण्यासाठी पुढाकार घेण्यास तयार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
केडगाव ग््राामपंचायतीचा पुढाकार व नागरिकांची अपेक्षा वाढली असून, केडगाव ग््राामपंचायतीने आपल्या मालकीच्या जागेत कार्यालयासाठी सोयीसुविधांसह जागा उपलब्ध करून देण्याची तयारी दर्शवली आहे. त्यामुळे जर शासनाने सकारात्मक निर्णय घेतला तर नागरिकांना दिलासा मिळेल, सुविधायुक्त व सुरक्षित कार्यालय उभारले जाईल आणि कामकाज सुरळीत पार पडेल, अशी अपेक्षा आहे. दुय्यम निबंधक कार्यालय केडगाव हद्दीत नव्याने सुरू व्हावे. यामुळे सर्वसामान्यांची गैरसोय थांबेल, सुरक्षितता मिळेल आणि गर्दी व पार्किंगचा प्रश्नही सुटेल हे मात्र नक्की.
सध्या असलेल्या कार्यालय परिसरात सुरक्षिततेचा अभाव आहे. पूर्वी अनेकदा चोरीसारखे प्रकार घडले असून रेकॉर्ड, दस्तऐवज, नागरिकांची कागदपत्रे यांची सुरक्षितता धोक्यात आली आहे. केडगाव हद्दीत कार्यालय सुरू झाल्यास चौकात पोलिस ठाणे व राष्ट्रीयीकृत व सहकारी बँका असल्याने सुरक्षितेच्या दृष्टिकोनातून सुरक्षा व्यवस्थेत लक्षणीय सुधारणा होईल, तसेच बाजार तळावर पार्किंगसाठी जागा मोठ्या प्रमाणावर उपलब्ध होणार आहे.
किरण देशमुख, माजी सदस्य, ग््राामपंचायत केडगाव
पक्षकार आणि वकिलांना स्वच्छतागृहाची कोणतीही सुविधा उपलब्ध नाही. पुणे जिल्ह्यातील विविध भागातील खरेदी-विक्री व नोंदणी व्यवहार येथे होत असल्याने गर्दी मोठ्या प्रमाणात वाढते. जागेची कमतरता असल्याने पार्किंगची प्रचंड समस्या निर्माण होते. अनेक वर्षांपासून नवीन व प्रशस्त जागेची मागणी केली जात आहे.
ॲड. जयसिंग लकडे, वकील, खोपोडी