Pune Katraj Kondhwa Road Widening: कात्रज-कोंढवा रस्तारुंदीकरणाला वेग; 48 मिळकतींचा ताबा घेत उड्डाणपुलाचे काम सुरू

भूसंपादनामुळे रखडलेला प्रकल्प मार्गी; दक्षिण पुण्यातील वाहतूक कोंडी कमी होण्याची अपेक्षा
Katraj Kondhwa Road Widening
Katraj Kondhwa Road WideningPudhari
Published on
Updated on

कात्रज /पुणे: कात्रज-कोंढवा रस्त्याच्या रुंदीकरणासाठी सुरू असलेल्या भूसंपादनाची प्रक्र्रिया आता वेगाने सुरू आहे. महापालिकेने गेल्या दोन दिवसांत 48 मिळकतींचा ताबा घेत महत्त्वाचा टप्पा पार केला आहे. यामुळे कात्रज चौकातील उड्डाणपूल उभारण्याच्या कामाला अखेर गती मिळाली आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून रखडलेल्या उड्डाणपुलाच्या कामाचा मार्ग आता मोकळा झाला आहे.

Katraj Kondhwa Road Widening
Pune Income Tax Collection: पुणे आयकर विभागाची विक्रमी वसुली; 1.33 लाख कोटींचा टप्पा पार

कात्रज-कोंढवा रस्तारुंदीकरण आणि भूसंपादन प्रक्रियेचा आढावा घेण्यासाठी महापौर मंजूषा नागपुरे आणि महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी अधिकाऱ्यांसोबत नुकतीच या कामाची पाहणी केली. आमदार योगेश टिळेकर, सभागृहनेते गणेश बिडकर, अतिरिक्त आयुक्त (विशेष) ओमप्रकाश दिवटे, प्रभाग समिती अध्यक्षा रंजना टिळेकर, नगरसेविका पूजा कदम, अर्चना जगताप, पथ विभाग अधीक्षक अभियंता अजित बांबळे, विशेष भूसंपादन अधिकारी श्वेता धारुणकर, उपअभियंता दिगंबर बांगर आदी या वेळी उपस्थित होते.

Katraj Kondhwa Road Widening
Maharashtra Agriculture Kharif Planning: खरीप 2026 नियोजनाचा आढावा; तंत्रज्ञानाचा प्रत्यक्ष वापर वाढवण्यावर भर

भूसंपादन निवाडा प्रक्रियेअंतर्गत राजकिरण सोसायटीची जागा 15 मे रोजी अधिकृतरीत्या ताब्यात घेऊन ती पथ विभागाकडे हस्तांतरित करण्यात आली. त्यानंतर लगेचच पथ विभागाने प्रत्यक्ष कामाला सुरुवात केली. या टप्प्यामुळे कात्रज चौकातील उड्डाणपूल उभारण्याचे रखडलेले काम वेगाने पूर्ण होणार आहे.

कात्रज-कोंढवा रस्तारुंदीकरणासाठी एकूण 109 मिळकतींचे भूसंपादन आवश्यक असून, गेल्या दोन दिवसांत 48 मिळकती ताब्यात घेण्यात आल्या आहेत. यामध्ये सुमारे 25 हजार चौरस मीटर क्षेत्रफळाचा समावेश आहे. प्रशासनाकडून वेगाने सुरू असलेल्या कार्यवाहीमुळे रुंदीकरणाला गती मिळाली आहे.

Katraj Kondhwa Road Widening
Pune Hawker Protest: पुण्यात पथारी व्यावसायिकांचा महापालिकेविरोधात आक्रमक पवित्रा; शुल्क व दंड रद्द करण्याची

दक्षिण पुण्यातील अत्यंत वर्दळीचा आणि महत्त्वाचा मानला जाणारा कात्रज-कोंढवा मार्ग अरुंद रस्ता, वाढती लोकवस्ती आणि जड वाहतुकीमुळे कायम वाहतूक कोंडीचा सामना करीत आहे. त्यामुळे या रस्त्याच्या रुंदीकरणाकडे नागरिकांचे विशेष लक्ष लागले असून, आता भूसंपादन प्रक्रियेला वेग आल्याने प्रत्यक्ष कामांनाही गती मिळणार असल्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

उड्डाणपुलाच्या कामातील अडथळा दूर

या भूसंपादनामुळे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून सुरू असलेल्या कात्रज उड्डाणपुलाच्या उतारासाठी आवश्यक जागा उपलब्ध झाली आहे. त्या ठिकाणी महापालिकेच्या पथ विभागाने प्रत्यक्ष कामालाही सुरुवात केली असून, उड्डाणपूल प्रकल्प पूर्णत्वास नेण्याचा मार्ग आता मोकळा झाल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.

Katraj Kondhwa Road Widening
Palakhi Highway Indapur: इंदापूर पालखी महामार्गाची गडकरींकडून पाहणी; काम लवकर पूर्ण करण्याचे आश्वासन

कात्रज-कोंढवा रस्तारुंदीकरणासाठी आवश्यक भूसंपादन प्रक्रिया वेगाने सुरू आहे. उर्वरित जागाही लवकरच महापालिकेच्या ताब्यात घेऊन हा रस्ता गुणवत्तापूर्ण आणि वेगाने पूर्ण करण्यात येईल.

मंजूषा नागपुरे, महापौर

भूसंपादनासाठी सरकारकडून उपलब्ध झालेला निधी आणि जिल्हाधिकारी ते मंत्रालयस्तरावर केलेल्या पाठपुराव्यामुळे भूसंपादन प्रक्रिया सुरू झाली आहे. त्यामुळे कात्रज-कोंढवा रस्तारुंदीकरणाच्या कामाला वेग मिळाला आहे.

योगेश टिळेकर, आमदार, विधान परिषद

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news