Pune Income Tax Collection: पुणे आयकर विभागाची विक्रमी वसुली; 1.33 लाख कोटींचा टप्पा पार

पुणे आयकर विभागाने 2025-26 मध्ये 1.33 लाख कोटींची विक्रमी वसुली केली असून आगामी वर्षासाठी 1.60 लाख कोटींचे उद्दिष्ट ठेवण्यात आले
Income Tax
Income TaxPudhari
Published on
Updated on

पुणे: पुणे प्राप्तिकर विभागाने यंदा विक्रमी वसुली केली आहे. आर्थिक वर्ष 2025-26 दरम्यान विभागाने करदात्यांकडून सुमारे 1 लाख 33 हजार 635 कोटी रुपयांचा (98.5 टक्के) आयकर वसूल केला. आगामी आर्थिक वर्ष 2026-27 साठी, विभागाने 1 लाख 60 हजार कोटींचे उद्दिष्ट ठेवले आहे.

Income Tax
Maharashtra Agriculture Kharif Planning: खरीप 2026 नियोजनाचा आढावा; तंत्रज्ञानाचा प्रत्यक्ष वापर वाढवण्यावर भर

पुणे विभागाचे नवनियुक्त प्रधान आयकर आयुक्त विवेक वाडेकर यांनी ही माहिती दिली. यंदा 1 एप्रिल 2026 पासून आयकर विभागाने ‌‘नवीन आयकर कायदा, 2025‌’ (न्यू इन्कम टॅक्स ॲक्ट 2025) लागू केला आहे. याविषयी जनतेमध्ये जागृती निर्माण करण्यासाठी आणि ‌‘विकसित भारत मिशन‌’चा एक भाग म्हणून कर प्रणालीशी संबंधित क्षेत्रात प्रसिद्धी आणि जागृतीचा विस्तार करण्याच्या उद्देशाने ‌‘प्रारंभ 2026‌’ नावाचा कार्यक्रम आयोजित केला आहे. त्या निमित्ताने आयुक्त वाडेकर बोलत होते.

Income Tax
Pune Hawker Protest: पुण्यात पथारी व्यावसायिकांचा महापालिकेविरोधात आक्रमक पवित्रा; शुल्क व दंड रद्द करण्याची

या वेळी प्रधान आयकर आयुक्त (पीआयसीटी) अभिनय कुंभार, अतिरिक्त आयकर आयुक्त शशांक देवगडकर, सत्यम श्रीवास्तव, ‌‘आउटरीच ब्युरो‌’च्या (पुणे) प्रमुख सुप्रिया घायतडक आणि आयकर विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

पुणे विभागाची जोरदार कामगिरी

  • विभागात 10 कोटींहून अधिक ‌‘पॅन‌’ धारक करदाते

  • एक कोटींहून अधिक आयकर विवरणपत्रे दाखल झाले.

  • दोन लाखांहून अधिक नोंदणीकृत सार्वजनिक विश्वस्त संस्था आणि सोसायट्या

  • पुणे विभागाच्या कार्यक्षेत्रात 23 जिल्ह्यांचा समावेश आहे.

Income Tax
Palakhi Highway Indapur: इंदापूर पालखी महामार्गाची गडकरींकडून पाहणी; काम लवकर पूर्ण करण्याचे आश्वासन

उद्योगांचा वाटा मोठा

  • उद्योग क्षेत्र: 42 ते 43 टक्के

  • वित्तीय क्षेत्र: 18 टक्के.

  • माहिती तंत्रज्ञान क्षेत्र:15 टक्के

  • किरकोळ विक्री क्षेत्र: 9 टक्के

  • लघु उत्पादन क्षेत्र: 7 टक्के

Income Tax
Pune Police Extortion Case: प्राचार्यांना ब्लॅकमेल करून 7 लाखांची खंडणी; पीएसआयसह दोघांना अटक

प्रधान आयुक्त वाडेकर म्हणाले...

  • नवीन आयकर कायद्याबाबत माहिती देण्याची मोहीम पुण्यातून सुरू होईल, 18 मे पासून, पंधरा जिल्ह्यांमध्ये लोकसंपर्क

  • लोकजागृती कार्यक्रम एकूण 23 जिल्ह्यांमध्ये टप्प्याटप्प्याने राबवणार

  • नवीन 2025 चा नवीन आयकर कायदा अशा प्रकारे तयार करण्यात आला आहे की, तो सामान्य माणसाला सहजपणे समजू शकेल.

  • शुक्रवारी 15 मे रोजी सकाळी 10:30 वाजता कॉसमॉस टॉवर, गणेशखिंड शिवाजीनगर येथे संपन्न होईल.

  • या कार्यक्रमाला खासदार मेधा कुलकर्णी, उद्योजक लीला पूनावाला, प्रदीप भार्गव आणि अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news