पिंपरी: कर्नाटक फणसाने केले कोकणला ‘ओव्हरटेक’
पिंपरी : पुढारी वृत्तसेवा
कर्नाटकी फणस मोशी, पिंपरी बाजारात दाखल झाले असून, कोकणातील फणसांसाठी थोडी प्रतीक्षा करावी लागणार आहे. मोशी येथील बाजारात कर्नाटक फणसाची विक्री केली जात आहे. कोकणातील फणस जूनच्या पहिल्या आठवड्यात बाजारात येतील, असा अंदाज व्यापारी व्यक्त करीत आहेत.
कर्नाटकमधील अनेक भागांमध्ये फणसाचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतले जाते. कोकणातील फणसाचे गरे 150-2000 रुपये किलो दराने विकले जात असून कर्नाटकी फणसाला चांगला भाव मिळत आहे. 200 रुपये पासून 300 ते 400 रुपये दराने फणसाचे गरे विकले जात आहेत. दक्षिणेतील अनेक भागांमध्ये फणसाची शेती केली जाते. फणसाच्या आकारानुसार विक्री केली जात आहे.
फरक कसा ओळखाल..?
कर्नाटक फणस कोकणी फणस
आकाराने मोठे आकाराने लहान
फणसावर काळे डाग फणसावर डाग नसतात
फणसावर मध्ये फणस संपूर्ण हिरवे असते
चॉकलेटी रंग असतो
जून महिन्यात फणसाची आवक वाढेल असा अंदाज असून, आवक वाढल्यावर भाव कमी होतील. आता बाजारात कर्नाटकी फणसांची विक्री होत आहे.
– शंकर शिरसाट, व्यापारी

