Karna Marathi Play: नटराजच्या ‘कर्ण’ नाटकाचे दिल्लीत दोन विशेष प्रयोग

राज्य हौशी नाट्यस्पर्धेत पुणे केंद्रात प्रथम; बारामतीच्या नाटकाला राजधानीत दाद
राज्य नाट्य स्पर्धेच्या पुणे केंद्रारील प्राथमिक फेरीत प्रथम पारितोषिक मिळविणाऱ्या 'कर्ण' नाटकातील एक प्रसंग
राज्य नाट्य स्पर्धेच्या पुणे केंद्रारील प्राथमिक फेरीत प्रथम पारितोषिक मिळविणाऱ्या 'कर्ण' नाटकातील एक प्रसंगPudhari
Published on
Updated on

बारामती : ६४ व्या महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेत पुणे केंद्रातून प्रथम क्रमांक पटकावलेल्या 'कर्ण' या नाटकाचे दिल्ली येथे दोन विशेष नाट्यप्रयोग आयोजित करण्यात आले आहेत.

राज्य नाट्य स्पर्धेच्या पुणे केंद्रारील प्राथमिक फेरीत प्रथम पारितोषिक मिळविणाऱ्या 'कर्ण' नाटकातील एक प्रसंग
Pune Nashik Railway: पुणे–नाशिक रेल्वे खेड–आंबेगाव–जुन्नरमार्गेच हवी; वळसे पाटीलांचा ठाम आग्रह

हे नाटक नटराज नाट्य कला मंडळ, बारामती यांनी सादर केले असून या नाटकाने पुणे केंद्रात नुकताच प्रथम क्रमांक मिळविला आहे. दिल्लीतील प्रयोग कारवा ग्रुप यांच्या सहकार्याने होणार आहे, अशी माहिती नटराज नाट्य कला मंदिर संस्थेकडून देण्यात आली.

राज्य नाट्य स्पर्धेच्या पुणे केंद्रारील प्राथमिक फेरीत प्रथम पारितोषिक मिळविणाऱ्या 'कर्ण' नाटकातील एक प्रसंग
Pune Municipal Election Transfer Ban: पुणे महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बदल्यांना स्थगिती

महाभारतातील कर्णाच्या जीवनावर आधारित हे नाटक सामाजिक, मानवी व भावनिक संघर्ष प्रभावीपणे उलगडून दाखवते. नाटकाचे लेखक व दिग्दर्शक कुलविंदर बक्शीश सिंह असून त्यांच्या प्रभावी दिग्दर्शनामुळे नाटकाला विशेष उंची प्राप्त झाली आहे.

राज्य नाट्य स्पर्धेच्या पुणे केंद्रारील प्राथमिक फेरीत प्रथम पारितोषिक मिळविणाऱ्या 'कर्ण' नाटकातील एक प्रसंग
Pune Metro Project: मेट्रोसाठी उड्डाणपूल फोडण्याआधीच विद्युतरोषणाईवर दोन कोटींचा खर्च

हे दोन नाट्यप्रयोग शनिवारी (दि. २०) दुपारी ४ वाजता व सायंकाळी ६.३० वाजता दिल्ली येथील कामिनी ऑडिटोरियम येथे होणार आहेत. दिल्ली व परिसरातील मराठी नाट्यरसिकांनी या दर्जेदार नाट्यकृतीचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news