Pune leopard News : जुन्नर पर्यटन खास, बिबटया दिसतो हमखास; अवघा तालुकाच बिबटमय

Pune leopard News : जुन्नर पर्यटन खास, बिबटया दिसतो हमखास; अवघा तालुकाच बिबटमय
Published on
Updated on

ओतूर(पुणे); पुढारी वृत्तसेवा : राज्यात इतर गावांच्या तुलनेत जुन्नर तालुक्यात बिबट्याची संख्या कमालीची वाढली असल्याचे स्पष्ट जाणवते आहे. येथील प्रत्येक गावात बिबट्याची संख्या दररोज कुठे ना कुठे होणाऱ्या पशुधनावर व मानवावरील हल्ल्यावरून तसेच बिबट संबधी विविध घटनांवरून निदर्शनास येते. पशुधन व दुचाकीस्वारावरील बिबट्याचे हल्ले नित्याचेच झाले आहेत. कधी झाडावर तर कधी वर्दळीच्या रस्त्यांवर, शेतात, बांधावर, गोठ्यात घरात, मानवी वस्त्यांमधूनही दिवसा बिबट्याचे दर्शन सुलभ झाले आहे.

पुणे-नाशिक मार्ग, कल्याण नगर मार्ग, जिल्हा मार्ग अशा वर्दळीच्या आणि तालुक्यातील सर्वच रस्त्यांवर बिबट्याचा वावर वाढला आहे, नव्हे तर आता बिबट्याचे अपघातही होऊ लागले आहेत. अद्यापपर्यंत असंख्य बिबटे विहिरीतून बाहेर काढण्यात आले आहेत तर काही बिबट्याना विहिरीत आपले प्राण गमवावे लागले आहेत. त्याउलट बिबट्याचे पशुधनावरी हल्ले व मानवी हल्ले थांबायला तयार नाहीत.

शेतात काम करताना चर्चा फक्त बिबट्याचीच

शेतकरी तर जीव मुठीत धरून शेतात काम करतात. शेतकाम करताना दिवसभर प्रत्येकाचे तोंडी चर्चा असते ती फक्त बिबट्याचीच. सायंकाळी ५ वाजता बाजारातून घरी परतणारी प्रत्येक व्यक्ती म्हणते "चला लवकर आमच्याकडे बिबटे आहेत" एव्हढी प्रचंड दहशत ग्रामीण भागात पसरली आहे. तालुक्यात अलीकडच्या काळात बिबट्याची संख्या चांगलीच रोडावली असून जुन्नरच्या गावागावातील नागरिकांसाठी ही एक गंभिर व चिंतेची बाब बनली आहे.bत्यामुळे "तालुका पर्यटनासाठी खास, मात्र बिबटया दिसतो हमखास" अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.

बिबट सफारीचे भिजत घोंगडे

गेली अनेक वर्षांपासून बिबट सफारीचा विषय सर्वत्र चघळला जात आहे. बिबट सफारीमुळे बिबट व मानव दोन्ही सुरक्षित होऊ शकतात व बिबट मानव संघर्षाला पूर्णविराम मिळून पर्यटनाला चालना तर बेरोजगारीही संपुष्टात येण्यास मोठी मदत मिळू शकते हे एक सत्य असताना बिबट सफारी बाबत नेमके काय? या बाबत नागरिकांमध्ये संभ्रमावस्था निर्माण झाली आहे. अखेर बिबट सफारीचे भिजत घोंगडे जैसे थेच राहून गेल्याची जोरदार चर्चा सर्वसामान्यांमध्ये आहे.

हेही वाचा

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news