Junnar Nagar Parishad Election: जुन्नरला मतदानाचा टक्का घसरला; नगराध्यक्षपदाची माळ कोणाच्या गळ्यात? निकालाबाबत तर्कवितर्क

राष्ट्रवादीत (अजित पवार गट) नाराजीचा फटका, तर शिंदे गटाला काँग्रेसच्या छुपी मदतीची आशा; ईव्हीएम छेडछाडीच्या संशयाने कार्यकर्त्यांचा जीव टांगणीला.
Junnar Nagar Parishad Election
Junnar Nagar Parishad ElectionPudhari
Published on
Updated on

सुरेश वाणी

नारायणगाव : जुन्नर नगरपरिषदेची निवडणूक अतिशय चुरशीशी झाली असली, तरी मतदानाचा टक्का घसरल्याने नगराध्यक्षपदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार? याबाबत तर्कवितर्क लढविले जात आहेत. जुन्नर नगरपरिषदेच्या झालेल्या निवडणुकीत 68 टक्के मतदान झाले. मतमोजणी लांबल्यामुळे कार्यकर्त्यांचा जीव टांगणीला लागला असून ‌’ईव्हीएम‌’ मशिनमध्ये काही छेडछाड तर होणार नाही ना? असाही संशय व्यक्त होऊ लागला आहे. दरम्यान, ज्या ठिकाणी ‌’ईव्हीएम‌’ मशिन ठेवले आहेत, त्या ठिकाणी पोलिसांचा 24 तास कडेकोट पहारा ठेवण्यात आला आहे.

Junnar Nagar Parishad Election
Pune Nashik High-Speed Rail: पुणे-नाशिक हायस्पीड रेल्वेला 'ग्रीन सिग्नल'! GMRT चा जुना मार्ग रद्द, चाकण औद्योगिक वसाहतीमार्गे धावणार

जुन्नर नगरपरिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने स्वतंत्र पॅनेल उभे करून स्नेहल खोत यांना नगराध्यक्षपदाची उमेदवारी दिली होती. नगरसेवकपदाच्या सर्व वीसही जागांवर उमेदवार उभे केले होते. उपमुख्यमंत्री अजित पवार यांची जुन्नरला झालेली सभा व सभेला झालेली गर्दी, यामुळे कार्यकर्त्यांना विजयाची अधिकची खात्री वाढली आहे. तथापि, नगराध्यक्षपदासाठी शेफाली शेवाळे यांना उमेदवारी न मिळाल्याने शेवाळे कुटुंब नाराज होते. त्यांच्या नाराजीचा फटका किती बसेल? यावर देखील राष्ट्रवादी काँग्रेसच्या विजयाची गणित अवलंबून असणार आहेत. सासरा नगरसेवकपदासाठी व सून नगराध्यक्षपदासाठी उभी राहिल्याने याचा फटका, या पक्षाला कितपत बसेल, यावर देखील विजयाची गणितं अवलंबून आहेत.

Junnar Nagar Parishad Election
PMC Election History: लोकमान्य टिळकांनी लढवली होती पुणे नगरपालिकेची निवडणूक, 1895 मध्ये काय घडलं होतं?

भाजपचे अवघ्या सात जागांवर उमेदवार उभे होते तसेच नगराध्यक्षपदासाठी तृप्ती परदेशी यांना संधी दिली होती. भोसरीचे अपक्ष आमदार शरद सोनवणे यांनी भारतीय जनता पक्षाला ऐनवेळी वाऱ्यावर सोडून तर दिलेच; शिवाय काँग्रेस पक्षाच्या हाताला साथ देऊन नगराध्यक्षपदासाठी मुस्लिम उमेदवार उभा करून राष्ट्रवादी काँग्रेसकडे जाणारी मते थोपवून ठेवण्याचा प्रयत्न केला आहे. काँग्रेसच्या नगराध्यक्षपदाला जेवढी जास्त मते पडतील तेवढा फायदा शिवसेनेला होऊ शकतो. काँग्रेसच्या उमेदवाराला जास्तीची पडणारी मते ही राष्ट्रवादी काँग्रेसला फटका देणारी ठरू शकतात. शिवसेनेने मधुकर काजळे यांना ऐनवेळी शिवसेनेत घेऊन त्यांच्या पत्नी सुजाता काजळे यांना नगराध्यक्षपदाची उमेदवारी दिली. तसेच स्वतः मधुकर काजळे यांनीसुद्धा एका प्रभागातून नगरसेवकपदासाठी उमेदवारी अर्ज कायम ठेवला आहे.

Junnar Nagar Parishad Election
PMC Election Politics: कोथरूडमध्ये 'दादा-अण्णां'च्या समर्थकांत रस्सीखेच! भाजपच्या बालेकिल्ल्यात उमेदवारीसाठी 'काँटे की टक्कर'

शिवसेनेकडून काँग्रेसला झालेली छुपी मदत, यामुळे जर राष्ट्रवादी काँग्रेसची मते घटली व काँग्रेसची वाढली तर सुजाता काजळे यांना नगराध्यक्ष होण्याचा मार्ग अधिक सुकर होऊ शकतो. शिवसेनेने 17 जागांवर नगरसेवकपदासाठी उमेदवार उभे केले होते व नगराध्यक्षपदाची उमेदवारी सुजाता काजळे यांना दिली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या जुन्नरला शेवटच्या टप्प्यात झालेल्या सभेचा शिवसेनेला फायदा कितपत होईल, हे देखील महत्त्वाचे ठरणार आहे. जुन्नर नगरपरिषद निवडणुकीत खऱ्या अर्थाने राष्ट्रवादी विरुद्ध शिवसेना असाच सामना पाहायला मिळाला. तथापि, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे व राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार या पक्षांच्या आघाडीने या निवडणुकीत पॅनेल उभे केले होते. 12 उमेदवार नगरसेवकपदासाठी, तर गौरी शेटे यांना नगराध्यक्षपदाची उमेदवारी दिली होती. शिवसेनेचे (उबाठा) जुन्नरचे नेते माजी नगराध्यक्ष सुनील मेहेर यांच्या पत्नी कांचन मेहेर यांना नगराध्यक्षपदाची उमेदवारी न दिल्याने त्यांनी बंडखोरी केली होती. या बंडखोरीचा फटका शिवसेनेला बसण्याची दाट शक्यता आहे.

Junnar Nagar Parishad Election
PMC Election Problems: भाजपच्या बालेकिल्ल्यात 'डुक्कर पैदास केंद्र'! कोथरूड-डेक्कन परिसरात बकालपणा, नागरिकांचा जीव धोक्यात

या निवडणुकीत महाविकास आघाडीतून काँग्रेस पक्ष बाहेर पडला होता. काँग्रेसने नगरसेवकपदाच्या अवघ्या चार जागा लढविल्या तसेच रहिना इसाक कागदी यांना नगराध्यक्षपदाची उमेदवारी दिली आहे. काँग्रेसच्या नगराध्यक्षपदाला जुन्नरच्या मुस्लिम मतांचा जास्त फायदा होईल, असा दावा तालुका काँग्रेसचे अध्यक्ष अशोक घोलप यांनी केला आहे. जुन्नर शहरामध्ये मुस्लिमांची मते 9000 असून, यापैकी साडेसहा हजार मतदान झाले तर त्यातील किमान पाच ते साडेपाच हजार मते काँग्रेसला पडतील, असा दावा त्यांनी केला असून, तर तसे घडले तर ऐनवेळी काँग्रेसचा ‌‘हात‌‘ वेगळा करिष्मा करू.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news