

पुणे : महाराष्ट्रातील दोन महत्त्वाच्या आर्थिक आणि सांस्कृतिक केंद्रांना जोडणाऱ्या पुणे-नाशिक हायस्पीड रेल्वे मार्गाच्या नव्या मार्गाला लवकरच हिरवा कंदील मिळणार आहे. या रेल्वेचा जुना जीएमआरटी मार्ग रद्द करण्यात आला असून, आता ही रेल्वे नव्या पुणे (चाकण औद्योगिक वसाहतीमार्गे)-अहिल्यानगर-निंबळक-पुणतांबा-पिंपळगाव-साईनगर शिर्डी-नाशिक या मार्गाने धावणार असल्याचे आज स्पष्ट झाले. या प्रकल्पामुळे राज्याच्या पायाभूत सुविधांच्या विकासात निर्णायक पाऊल टाकले जाणार आहे.
केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी लोकसभेत बुधवारी (दि.3) एका प्रश्नाच्या उत्तरात या प्रस्तावित मार्गाबाबत महत्त्वाची माहिती दिली. पुणे-नाशिक रेल्वेचा मूळ प्रस्तावित मार्ग नारायणगावातून जात होता आणि तो खोडद येथील जीएमआरटी या आंतरराष्ट्रीय खगोल-निरीक्षक प्रकल्पाजवळून जाणारा होता. विज्ञान-तंत्रज्ञान विभाग आणि अणुऊर्जा
विभागाने या मार्गाबाबत आक्षेप नोंदवला. रेल्वे लाईनमुळे दुर्बिणीची निरीक्षणे बिघडण्याचा धोका असल्याने हा मार्ग अव्यवहार्य असल्याने नव्या मार्गाचा प्रस्ताव तयार केला आहे. राज्य सरकार, स्थानिक प्रतिनिधी आणि तज्ज्ञांच्या चर्चेनंतर जीएमआरटी क्षेत्र टाळून नवीन पर्यायी मार्ग निश्चित करण्यात आला आहे.
- नाशिक रोड-साईनगर शिर्डी दुहेरीकरणाचे डीपीआर तयार.
- साईनगर शिर्डी-पुणतांबा (17 किमी) दुहेरीकरणासाठी 240 कोटींची मंजुरी.
- पुणतांबा-निंबळक 80 किमी दुहेरीकरण पूर्ण.
- निंबळक-अहिल्यानगर 6 किमी दुहेरीकरणाचे काम सुरू.
- अहिल्यानगर-पुणे (133 किमी) नवीन दुहेरी मार्गासाठी 8,970 कोटींचे डीपीआर पूर्ण, चाकण औद्योगिक वसाहतीला थेट जोडणार.
चाकण औद्योगिक वसाहत, देशातील सर्वात वेगाने वाढणाऱ्या उत्पादन केंद्रांपैकी एक असून, या मार्गाच्या केंद्रस्थानी येणार आहे.
- लॉजिस्टिक (दळणवळण खर्च) खर्चात मोठी बचत
- मालवाहतुकीची गती वाढणार
- एमएसएमई व सप्लाय-चेन क्लस्टर्सना नवी गुंतवणूक संधी
- महाराष्ट्राचे उत्पादन केंद्र म्हणून बळकटीकरण होण्यास मदत
नाशिक-साईनगर शिर्डी-पुणतांबा-निंबळक-अहिल्यानगर-पुणे (चाकण औद्योगिक वसाहतीमार्गे) असा असणार नवीन मार्ग
नव्या मार्गाने उद्योग, शिक्षण आणि पर्यटनाला मोठी चालना मिळण्याचा दावा
नवीन मार्गामुळे महाराष्ट्रातील तीन महत्त्वाच्या पर्यटन पट्ट्यांना नवी चालना मिळणार आहे.
शिर्डीहून नाशिक व पुण्याला सुलभ जोड त्र्यंबकेश्वर, पंढरपूर व संत परंपरेची विविध केंद्रे
पुण्याचे ऐतिहासिक किल्ले, पेशवाई वारसा ग््राामीण पर्यटन व स्थानिक हस्तकला बाजारांना संधी.
यात्रेकरू आणि पर्यटकांसाठी प्रवास अधिक जलद, सुरक्षित आणि सोयीस्कर होणार आहे.