बारामतीत ज्वारीचे भाव तेजीत

बारामतीत ज्वारीचे भाव तेजीत

बारामती : पुढारी वृत्तसेवा :  कृषी उत्पन्न बाजार समितीत गुरुवारी (दि. 7) झालेल्या लिलावात धान्याची विक्रमी आवक झाली. लोकवन व 2189 गव्हाची तब्बल 580 क्विंटल आवक झाली. गव्हाला 2000 ते 2500 रुपये क्विंटल भाव मिळत आहे. लोकवन गव्हाची 348 क्विंटल आवक झाली. 2189 या गव्हाची 232 क्विंटल आवक झाली. तांबड्या मक्याची 361 क्विंटल आवक झाली. मक्याला सरासरी 2260 रुपये, तर जास्तीत जास्त 2280 रुपये प्रतिक्विंटल भाव मिळाला. 10 जुलै रोजी झालेल्या लिलावात ज्वारीला सर्वाधिक 6,051 असा उच्चांकी भाव मिळाला होता. यात वाढ होत असून, गावरान ज्वारीला कमाल 6,671 रुपये प्रतिक्विंटल भाव मिळाला. हायब्रीड ज्वारीसाठी 3000 ते 3300 असा भाव मिळत आहे.

बाजार समितीत गूळ, बाजरी, हरभरा, तूर, मूग, मका यांचीही आवक झाली. महिको आणि हायब—ीड बाजरीचे भाव स्थिर असून, बाजरीला जास्तीत जास्त 2251 ते 2700 असा सरासरी भाव मिळाला. हरभर्‍याच्या भावात मात्र वाढ होत आहे. गरडा हरभर्‍यासाठी सरासरी किमान 5000 आणि जास्तीत जास्त 5800 रुपये प्रतिक्विंटल भाव मिळाला. जाडा हरभर्‍यासाठी किमान 5300, कमाल 6550, सरासरी 6000 रुपये भाव मिळाला.

बाजार समितीत उडदाची 208 क्विंटल आवक झाली. उडदाला कमाल 9711 आणि सरासरी 9 हजार 621 क्विंटलला भाव मिळाला. याशिवाय बाजार समितीत तूर, खपली, गूळ, साळ आधी भरडधान्यांची आवक झाली.

हे ही वाचा : 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news