पुणे : जि. प. नोकरभरतीची डेमो लिंक

पुणे : जि. प. नोकरभरतीची डेमो लिंक

पुणे; पुढारी वृत्तसेवा : जिल्हा परिषदेमधील कर्मचारी भरतीप्रक्रियेमध्ये डेमो लिंकची पडताळणीसाठी काही जणांकडून अर्ज भरून घेण्यात आले. त्याद्वारे उमेदवारांना येणार्‍या अडचणी लक्षात घेऊन त्यांचे आठवडाभरात निवारण करण्यात येणार आहे. त्यामुळे उमेदवारी अर्ज मागवण्यासाठी अंतिम लिंक आणि कर्मचारी भरतीची जाहिरात येत्या काही दिवसांत येण्याची शक्यता आहे.
राज्यात तलाठी भरतीनंतर जिल्हा परिषद कर्मचार्‍यांची मोठी कर्मचारी भरती असणार आहे.

त्यासाठी कर्मचार्‍यांची रिक्त पदे आणि अनुषंगिक सर्व तपशील उपलब्ध करून जाहिरातीची अंतिम तयारी पूर्ण झाली आहे. डेमो लिंकनंतर अंतिम लिंक पाठवण्यासाठी ग्रामीण विकास विभागाकडून सूचना येताच, जिल्हा परिषद कर्मचारी भरतीची प्रक्रिया जिल्हास्तरावरूनच केली जाणार आहे. गेल्या तीन-चार महिन्यांपासून जिल्हा परिषद कर्मचारी भरतीसाठीची प्रक्रिया आणि प्रशासकीय पातळीवर तयारी सुरू आहे. आतापर्यंत प्रत्येक टप्प्यावर या भरतीची जाहिरात लांबणीवर पडत चालली आहे.

गेल्या आठवड्यात उमेदवारी अर्ज भरण्यासाठीचे डेमो लिंक पाठवण्यात आली होती. त्यामध्ये काही उमेदवारांनी शंका उपस्थित केली होती, त्याचे निराकरण करण्यात येत आहे. कर्मचारी भरतीसाठी सुमारे 2014 पासून जिल्हा परिषद कर्मचारी भरतीसाठी अभ्यासक्रम निश्चित नव्हता. यामध्ये अनेक बदल झाले असल्याने शासनाने अभ्यासक्रम निश्चित करण्यासाठी समिती नियुक्त केली होती. या समितीने एकूण सर्व 27 संवर्गासाठी अभ्यास निश्चित केला आहे. त्याचबरोबर शैक्षणिक पात्रता ठरवलेली आहे.

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news