Jejuri Toll Demand: जेजुरीत टोल माफीची जोरदार मागणी

आळंदी–पंढरपूर महामार्ग पाहणीत नितीन गडकरी यांच्याकडे स्थानिकांचा टोल रद्द करण्याचा आग्रह
Nitin Gadakari
Nitin GadakariPudhari
Published on
Updated on

जेजुरी: केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्याकडून आळंदी ते पंढरपूर राष्ट्रीय महामार्गाची पाहणी करण्यात आली. यावेळी जेजुरी येथे भाजपाच्या वतीने स्थानिकांना या राष्ट्रीय महामार्गावर टोल माफ करावा अशी मागणी भाजपाच्या वतीने करण्यात आली.

Nitin Gadakari
Usha Jagadale: दौंडच्या पहिल्या महिला आमदार उषादेवी जगदाळे यांचे निधन

गुरुवारी (दि. १४) देशाचे केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी खासगी बसमधून हडपसर ते पंढरपूर या राष्ट्रीय महामार्गाची पाहणी केली. सासवड-जेजुरी राष्ट्रीय महामार्गावरील बेलसर फाटाजवळील टोल नाकाची त्यांनी पाहणी केली. यावेळी स्थानिक शेतकरी व नागरिकांनी पुरंदर तालुक्यातील स्थानिक नागरिकांना टोल रद्द करावा, अशी निवेदन देवून मागणी केली.

Nitin Gadakari
Pune Railway Bollywood Shooting Revenue: पुणे रेल्वे विभाग बॉलीवूडसाठी ‘पॉवर हाऊस’

जेजुरी येथे श्री मार्तंड देवसंस्थानचे प्रमुख विश्वस्त ॲड. विश्वास पानसे, विश्वस्त मंगेश घोणे,पोपट खोमणे व तहसीलदार विक्रम राजपूत यांची खंडोबा देवाची पगडी, देवाचा फोटो देवून तर जेजुरी शहर भाजपाच्या वतीने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची मूर्ती देवून नितीन गडकरी यांचा सन्मान केला.

Nitin Gadakari
Pune Heatwave 2026: पुणे-पिंपरीत उष्णतेचा कहर; तापमान 42 अंशांवर पोहोचले

यावेळी माजी आमदार अशोक टेकवडे, भाजपचे जेजुरी शहर अध्यक्ष सचिन पेशवे, पदाधिकारी अलका शिंदे, हेमंत सोनवणे, सचिन लंबाते, सदानंद बारभाई, शिवाजी बारसुडे, जेजुरी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी चारुदत्त इंगुले आदी उपस्थित होते.

Nitin Gadakari
Pune Metro Swargate Katraj: पुणे मेट्रो स्वारगेट–कात्रज भुयारी मार्गाचे काम वेगाने सुरू

आळंदी ते पंढरपूर या मार्गावरून संत ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा जात असतो. वारकरी बांधवांसाठी आळंदी ते पंढरपूर राष्ट्रीय महामार्ग विकसित करण्यात आला आहे. या राष्ट्रीय महामार्गावर बेलसर फाटा जवळील टोल नाक्यावर पुरंदर तालुक्यातील स्थानिक नागरिकांना टोल रद्द करावा, अशी मागणी भाजपाच्या वतीने करण्यात आली. यावेळी बारामती विभागाचे अप्पर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार, भोर विभागाचे पोलिस उपअधीक्षक राजेंद्रसिंह गौर उपस्थित होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news