Usha Jagadale: दौंडच्या पहिल्या महिला आमदार उषादेवी जगदाळे यांचे निधन

दोन वेळा आमदार राहिलेल्या उषादेवी जगदाळे-पाटील यांच्या निधनाने राजकीय व सामाजिक क्षेत्रात शोककळा
Usha Jagadale
Usha JagadalePudhari
Published on
Updated on

देऊळगाव राजे: दौंड तालुक्याच्या पहिल्या महिला आमदार उषादेवी कृष्णराव जगदाळे-पाटील यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. पुणे येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू असताना आज १४ मे त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाने दौंड तालुक्याच्या राजकीय, सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात हळहळ व्यक्त होत आहे.

Usha Jagadale
Pune Railway Bollywood Shooting Revenue: पुणे रेल्वे विभाग बॉलीवूडसाठी ‘पॉवर हाऊस’

उषादेवी जगदाळे-पाटील या दौंड विधानसभा मतदारसंघाच्या पहिल्या महिला आमदार होत्या. त्यांनी दोन वेळा आमदार म्हणून दौंड मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले. १९७२ मध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाकडून निवडणूक लढवत २१ हजार ४६५ मते मिळवून त्या प्रथमच विधानसभेत पोहोचल्या. त्यानंतर १९८५ मध्ये भारतीय काँग्रेस (समाजवादी) पक्षाकडून ३३ हजार ४०८ मते मिळवत त्यांनी दुसऱ्यांदा आमदारकी भूषवली.

Usha Jagadale
Pune Heatwave 2026: पुणे-पिंपरीत उष्णतेचा कहर; तापमान 42 अंशांवर पोहोचले

दौंड परिसरातील सामाजिक व राजकीय योगदानाबद्दल त्यांना ‘दौंड भूषण’ पुरस्काराने गौरविण्यात आले होते. दौंड शहर व तालुक्यात त्या प्रेमाने “माँसाहेब” म्हणून ओळखल्या जात. राजकारणाबरोबरच त्यांना वाचन आणि अध्यात्म यांची विशेष आवड होती,त्यांचे पती कृष्णराव (बाळासाहेब) जगदाळे हे देखील १९८० मध्ये दौंडचे आमदार राहिले होते.

Usha Jagadale
Pune Metro Swargate Katraj: पुणे मेट्रो स्वारगेट–कात्रज भुयारी मार्गाचे काम वेगाने सुरू

जगदाळे दाम्पत्याने अनेक वर्षे दौंडच्या राजकारणावर प्रभावी नेतृत्व केले,त्यांचे सुपुत्र वीरधवल जगदाळे पाटील हे पुणे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष आहेत तसेच दौंड शुगरचे संचालक आहेत. दुसरे सुपुत्र इंद्रजित जगदाळे हे नगरसेवक व माजी नगराध्यक्ष तसेच नगरसेवक आहेत.

Usha Jagadale
Pune Blood Shortage: पुण्यात रक्ताचा तुटवडा; रक्तदात्यांनी पुढे येण्याचे आवाहन

तर त्यांची नात दुर्गादेवी इंद्रजीत जगदाळे या दौंड नगर परिषदेच्या नगराध्यक्ष आहेत. त्यांच्यावर आज सायंकाळी सहा वाजता दौंड येथील भीमा नदीतीरावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या पश्चात मोठा राजकीय व सामाजिक वारसा कायम राहिला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news