Property Tax Collection: जेजुरी निवडणुकीत ८० लाखांची घरपट्टी वसूल; नगरपरिषदेचा ताण कमी

उमेदवार आणि सूचकांनी घरपट्टी भरण्यामुळे जेजुरीत मालमत्ता कर वसुलीचा मोठा टप्पा पूर्ण
Property Tax
Property TaxPudhari
Published on
Updated on

जेजुरी: जेजुरी नगरपरिषदेची सार्वत्रिक निवडणूक 2 डिसेंबर रोजी होत आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उमेदवारी अर्ज भरणारे उमेदवार आणि सूचकांनी सुमारे 80 लाख रुपये घरपट्टी भरली.

Property Tax
Teachers Protest: ५ डिसेंबरला राज्यभर 'शिक्षकांचा हुंकार'! मोठ्या आंदोलनाची घोषणा

जेजुरी शहरात 5070 मालमत्ताधारक आहेत. साधारणपणे 2 कोटी 87 लाख रुपये चालू वर्षाची घरपट्टीची मागणी आहे. मागील थकबाकी 3 कोटी 28 लाख रुपये एवढी आहे. वसुली करण्यासाठी मार्च-एप्रिल महिन्यात नगरपरिषदेचे अधिकारी-कर्मचारी घरोघरी जात असतात.

Property Tax
Mentoring Teacher Training: शालेय शिक्षकांना ‘प्राध्यापकांची गुरुकिल्ली’! प्रशिक्षण पद्धतीत मोठा बदल

प्रसंगी थकबाकीदारांच्या घरी जाऊन वाजंत्री वाजविणे, नळकनेक्शन तोडणे, फलकावर थकबाकीदारांची नावे प्रसिद्ध करणे अशी कारवाई करीत असतात. असे असूनही मागील वर्षी केवळ 33 टक्के घरपट्टीची वसुली झाली. त्यामुळे थकबाकीदारांची संख्या मोठी आहे.

Property Tax
Sugarcane Price Dispute: ऊस दराची कोंडी कधी फुटणार? तीन आठवडे उलटले, शेतकरी संतप्त

जेजुरी नगरपरिषदेची सार्वत्रिक निवडणूक आठ वर्षांनी होत आहे. त्यामुळे नागरिकांत मोठा उत्साह आहे. 7 ते 17 नोव्हेंबरपर्यंत नगराध्यक्ष व नगरसेवकपदासाठी उमेदवारी भरण्याची मुदत होती. उमेदवार तसेच सूचकांना घरपट्टी भरणे अनिवार्य असल्याने या कालावधीत सुमारे 91 अर्ज दाखल करणाऱ्या उमेदवार व सूचकांनी मालमत्ता कर भरला.

Property Tax
Pavana Dam Encroachment: पवना धरण परिसरातील अतिक्रमणांवर कारवाईचा धडाका

सुमारे 79 लाख 58 हजार रुपयांचा मालमत्ता कर जेजुरी नगरपरिषदेत जमा झाला. सुमारे 80 लाख रुपये मालमत्ता कर वसूल झाल्याने पालिका प्रशासनाचा घरपट्टी वसूल करण्याचा थोडाफार ताण कमी झाला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news