

जेजुरी: जेजुरी नगरपरिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीची मतमोजणी रविवारी (दि. 21) होत आहे. ही मतमोजणी दहा टेबलांवर आणि दोन फेऱ्यांत होणार आहे. तासाभरात संपूर्ण निकाल हाती येईल, अशी माहिती जेजुरी नगरपालिका निवडणूक निर्णय अधिकारी शीतल मुळे यांनी दिली.
जेजुरी नगरपरिषदेच्या मल्हार नाट्यगृहात रविवारी मतमोजणी होणार आहे. यासंदर्भात शुक्रवारी (दि. 19) अधिकारी व कर्मचाऱ्यांना मतमोजणीचे प्रशिक्षण देण्यात आले. या वेळी निवडणूक निर्णय अधिकारी मुळे, सहाय्यक निवडणूक अधिकारी चेतन कोंडे, जेजुरीचे सहाय्यक पोलिस निरीक्षक दीपक वाकचौरे उपस्थित होते.
जेजुरी नगरपरिषदेच्या निवडणुकीत दहा प्रभागांतून 20 उमेदवार व नगराध्यक्ष निवडला जाणार आहे. 2 डिसेंबर रोजी झालेल्या निवडणुकीत 15,800 मतदारांपैकी 12,333 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. सुमारे 78 टक्क्यांपेक्षा जास्त मतदान झाले. नगराध्यक्ष आणि नगरसेवकपदाच्या एकूण 53 उमेदवारांचे राजकीय भवितव्य मतदानयंत्रात बंद झाले.
ही निवडणूक राष्ट्रवादी काँग््रेास अजित पवार गट आणि भाजप यांच्यात झाली. दोन्ही पक्षांचे नगराध्यक्षपदाच्या उमेदवारांसह प्रत्येकी 21 उमेदवार रिंगणात होते. याखालोखाल शिवसेना शिंदे गटाचे नगराध्यक्षपदासह तीन, तर उबाठा गटाचे दोन आणि काँग््रेास व अपक्ष प्रत्येकी एक असे उमेदवार रिंगणात होते.
मतमोजणी एस दिवसावर आल्याने सर्वच उमेदवारांची धाकधुक वाढली आहे. कोण विजयी होणार, नगराध्यक्ष कोण होणार, कोणाला किती मते मिळणार, याचीच चर्चा सर्वत्र आहे. जेजुरी नगरपरिषदेच्या निवडणूक निर्णय अधिकारी शीतल मुळे यांनी मतमोजणीबाबत माहिती दिली.