Kalas Dhanori Lohgav Election 2025: कळस-धानोरी-लोहगाव प्रभागातील महापालिका निवडणुकीचा तापलेला राजकीय सामना

राष्ट्रवादी काँग्रेस व भाजपमधील उमेदवारांची तयारी आणि धानोरी भाग निर्णायक ठरण्याची शक्यता
Bjp vs Ncp
Bjp vs NcpPudhari
Published on
Updated on

पुणे: पुणे महापालिकेच्या आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर कळस-धानोरी-लोहगाव प्रभागातील (क्र. 1) राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. या प्रभागात राष्ट्रवादी काँग्रेस विरुद्ध भाजप सामना रंगण्याची चिन्हे आहेत. माजी नगरसेवकांसह प्रमुख इच्छुक उमेदवारांनी जनसंपर्क वाढविण्यासाठी विविध कार्यक्रमांची राळ उडवून दिली आहे. त्यामुळे विविध पक्षांच्या तिकिटांसाठी मोठी चुरस निर्माण झाली आहे.

Bjp vs Ncp
Rajgad Fort Pedestrian Path: राजगड किल्ल्याच्या पायीमार्गाची डागडुजी व पर्यटक सुविधा सुधारण्यासाठी चार कोटी रुपयांचा निधी

प्रभाग एकमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसकडून (अजित पवार गट) माजी नगरसेविका रेखा टिंगरे आणि शशिकांत टिंगरे यांची उमेदवारी निश्चित मानली जात आहे. भाजपकडून माजी नगरसेवक अनिल टिंगरे यांचीही उमेदवारी निश्चित समजली जाते. मात्र भाजपच्या ओबीसी महिला (नागरिकांचा मागास प्रवर्ग) उमेदवार कोण याबाबत तर्क वितर्क लढविले जात आहेत.

Bjp vs Ncp
Chandannagar Assault Case: चंदननगरमध्ये छेडछाडीच्या कारणातून तरुणावर जीवघेणा हल्ला

या प्रभागात 2017 मध्ये भाजपला तीन व राष्ट्रवादी काँग्रेसला रेखा टिंगरे यांच्या रूपाने केवळ एकच जागा मिळाली होती. भाजपचे अनिल टिंगरे व राष्ट्रवादी काँग्रेसच्या रेखा टिंगरे यांना धानोरीतील अधिकच्या मतदार संख्येने तारले होते. दोघांच्याही विरोधातील विश्रांतवाडी भागातील उमेदवारांना धानोरी, मुंजाबावस्ती, भैरवनगर, चौधरीनगर व इतर उपनगरांमध्ये जनसंपर्क साधण्यात मर्यादा आल्याचे पाहायला मिळाले होते. ही चूक दुरुस्त करण्यासाठी भाजपच्या अनिल टिंगरे यांच्याविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस धानोरीतीलच शशिकांत टिंगरे यांना उमेदवारी देण्याची दाट शक्यता आहे. शशिकांत टिंगरे यांनीही मागील काही वर्षांमध्ये जोरदार संघटन बांधणी केली आहे. कार्यकर्त्यांची मोट बांधण्यातही ते यशस्वी ठरत असल्याचे चित्र आहे. राष्ट्रवादी काँग्रेस अशी व्यूहरचना करण्याची शक्यता असल्याने भाजप नव्याने समाविष्ट झालेल्या आणि कमी मतदार संख्येच्या लोहगाव भागातील उमेदवार देणार की धानोरीतील याविषयी भाजप कार्यकर्ते साशंक आहेत. चौकार मारण्याच्या तयारीत असलेल्या रेखा टिंगरे आक्रमक प्रचार करीत असताना लोहगावमधील इच्छुकांकडून मात्र तशी तयारी होताना दिसत नाही.

Bjp vs Ncp
Yerwada Jail Murder: येरवडा कारागृहात फरशी हल्ल्यात कैद्याचा मृत्यू; खुनाचे कलम वाढवले

या प्रभागाची अंदाजे मतदारसंख्या पाहता कळस सुमारे 14 हजार, विश्रांतवाडी 3 हजार, धानोरी व उपनगर सुमारे 60 हजार, कलवड, साठेवस्ती, जुने मनपा क्षेत्र सुमारे 7 हजार तर लोहगाव भागात 20 ते 22 हजार मतदार असल्याचे चित्र आहे. यामध्ये धानोरी व उपनगरांचा प्रभाव निर्णायक ठरण्याची शक्यता वर्तवली जात आहे. ही आकडेवारी आणि समोरचा धोका लक्षात घेऊनच लोहगावमधील बहुतेक इच्छुकांनी धानोरीतील उमेदवारांविरोधात संघर्ष टाळण्यासाठी प्रभाग एकऐवजी जास्त मतदार संख्येच्या विमाननगर - लोहगाव - वाघोली या प्रभागात (प्रभाग क्र.3) आपले लक्ष केंद्रित केले आहे.

Bjp vs Ncp
Pune Air Pollution AQI: पुण्यात हवेची गुणवत्ता गंभीर; दाट वाहनकोंडीमुळे प्रदूषणाची कोंडी

दुसरीकडे वारंवार पक्षांतर करूनही माजी नगरसेविका रेखा टिंगरे धानोरी परिसरात अद्याप आपली पकड टिकवून आहेत. बचत गटांच्या माध्यमातुन त्यांनी घरोघरी जनसंपर्क ठेवला आहे. मात्र सलग तीन टर्मनंतर त्यांच्या बाबतीत असलेल्या अँटी इन्कम्बन्सीचा फायदा उठविण्यासाठी याच भागातील तगडा उमेदवार दिल्यास रेखा टिंगरे यांना रोखता येऊ शकते, अशी भाजप कार्यकर्त्यांना खात्री आहे. मात्र महिला ओबीसी उमेदवार निवडीत भाजपकडून चूक झाल्यास केवळ महिला ओबीसी उमेदवारच नव्हे, तर इतर उमेदवारांनादेखील त्याचा फटका बसू शकतो, असा अंदाज राजकीय विश्लेषक व्यक्त करत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news