

पुणेः अमेरिकेतील एक व्यक्ती जेफ्री एस्टीन यांच्या वादग्रस्त फाईल १९ डिसेंबर रोजी तेथील संसद खुल्या करणार आहे.
यात तीन भारतीय आजी-माजी खासदारांचा समावेश असून आपल्या देशाच्या राजकारणावर मोठा परिणाम होऊ शकतो.पंतप्रधानपदी महाराष्ट्रातील व्यक्तीची वर्णी लागू शकते असा पुनरुच्चार राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चौहान यांनी मंगळवारी पुण्यात केला.
पुणे श्रमिक पत्रकार संघाच्या वतीने मंगळवारी १६ डिसेंबर रोजी पृथ्वीराज चव्हाण यांच्या वार्तालापाचे आयोजन करण्यात आले होते.यात निवडणूक आयोग,पंतप्रधान नरेंद्र मोदी,महाराष्ट्रातील सरकार यांच्यावर तिखट शब्दांत टिका केली. त्यांनी पुन्हा एकदा देशाच्या राजकारणात भूकंप होणार,मराठी व्यक्ती पंतप्रधान होणार.. ही वक्तव्ये केल्याने त्यांच्यावर पत्रकारांनी प्रश्नांचा भडिमार केला.तेव्हा त्यांनी अमेरिकन व्यक्ती जेफ्री एस्टीन च्या फाईलची कथाच सांगितली.ते म्हणाले, ही एक वादग्रस्त व्यक्ती असून कोवळ्या वयातील मुलींना फसवून राजकीय नेत्यांना पुरवत असे.त्याला शिक्षा झाली पण त्याचा काही वर्षापूर्वी जेलमध्ये गुढ मृत्यू झाला.मात्र अमेरिकेतील संसदेने ही फाईल खुली करण्याचा निर्णय घेतलाआहे. ती १९ डिसेंबर रोजी खुली होणार आहे,त्यामुळे या तारखेला महत्व आहे.
चव्हाण यांना पत्रकरांनी अनेक प्रश्न विचारले.या फाईलचा भारताशी काय संबंध ? पंतप्रधान कसे बदलतील...? यावर सावध भूमिका घेत कुणाचेही नाव न घेता ते म्हणाले की, या फाईल मधील काही नावे पुढे आली आहेत.यात माजी अमेरिकन राष्ट्रपती बिल क्लिंटन,मायक्रो सॉफ्टचे प्रमुख बीट गेटस,इंग्लंडचा राजकुमार प्रीन्स ॲन्ड्र्यू यांची नावे आहेत.तसेच यात तीन भारतीय आजी-माजी खासदारांचा समावेश आहे.त्यामुळे सरकार पक्षातील खासदार असले तर पतप्रधानांना राजीनामा द्यावा लागेल अन भाजप मधील मराठी नेत्याची वर्णी तेथे लागेल.चव्हाण यांच्यावर पुन्हा प्रश्नांची सरबत्ती झाली.याला आधार काय..? यावर ते म्हणाले, जरा इंटरनेटवर अमेरिकेत काय सुरु आहे पहा.त्यावरुन अंदाज येईल.भाजपच्या सर्वोच्च नेत्याचे नाव आहे काय..? या प्रश्नावर त्यांनी मौन बाळगले आणि पुढे म्हणाले,हा माझा राजकीय तर्क आहे.
-निवडणूक आयोग सरकारचे बाहुले बनले आहे.माजी आयुक्त टी.एन शेषन यांच्यासारखा बाणा असणाऱ्या आयुक्तांची आज आठवण होते.हा आयोग स्वतंत्रपण कामच करीत नाही.
-सर्वंच निवडणुकांत भाजप पैसा ओतून निवडणुका जिंकत आहे.माझ्या कराडच्या मतदार संघात ६० ते ७० हजार बोगस मतदारांची नोंदणी आहे.त्याची तपासणी होत नाही.
-विरोधीपक्ष हतबल झाला हे खरे आहे.कारण भाजपकडे पाशवी बहुमत आहे.त्याच्या जोरावर ते वाट्टेल ते करीत आहे.आमचे कार्यकर्तेच कमी झाल्याने रस्त्यावर उतरुन आंदोलन करण्यात कमी पडत आहेत.
-अणुउर्जा निर्मिती क्षेत्र खासगी लोकांसाठी उघड केले जात आहे.ते चूकीचे आहे कारण ते विदेशी कंपनीच्या हाती गेले तर पुन्हा भोपाळ गॅसकांडासारखी घटना घडू शकते.कारण मी त्या खात्यात दीर्घकाळ काम केले आहे.
-माजी पंतप्रधान वाजपेयी यांनी पोखरण येथे जी अणु चाचणी केली ती घोडचूक होती.पाकिस्तान त्यामुळे जागा झाला अन त्यांनीही अण्वस्त्र बाळगण्यास सुरुवात केली.त्याची झळ आपल्याला नुकत्याच झालेल्या युध्दात बसली.