मिसिंग लिंक प्रकल्पाची पाहणी ; महामार्गाचे 75 टक्के काम पूर्ण : दादा भुसे

मिसिंग लिंक प्रकल्पाची पाहणी ; महामार्गाचे 75 टक्के काम पूर्ण : दादा भुसे

पुणे : पुढारी वृत्तसेवा :  सार्वजनिक बांधकाममंत्री दादा भुसे यांनी पुणे-मुंबई द्रुतगती महामार्गावरील खोपोली ते कुसगाव या लांबीतील नवीन मार्गिकेच्या (मिसिंग लिंक) प्रकल्पाच्या कामाची पाहणी केली. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास मंडळाचे सह व्यवस्थापकीय संचालक अनिलकुमार गायकवाड, मुख्य अभियंता राजेश पाटील, अधीक्षक अभियंता सतीश श्रावगी, कार्यकारी अभियंता अजित पाटील, उपअभियंता विशाल भोईटे आदी उपस्थित होते. भुसे म्हणाले, यशवंतराव चव्हाण द्रुतगती महामार्गावरील 13.3 किलोमीटर लांबीचा 'मिसिंग लिंक प्रकल्प' हा राज्य शासनाचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे.

या अंतर्गत 1.67 किलोमीटर आणि 8.92 किलोमीटर लांबीचे दोन बोगदे आहेत. या प्रकल्पाचे सुमारे 75 ते 80 टक्के काम पूर्ण झाले असून, सप्टेंबर 2024 पर्यंत प्रकल्पाचे काम पूर्ण करण्याचे नियोजन आहे. या प्रकल्पासाठी सुरक्षितेतच्या दृष्टिकोनातून जागतिक दर्जाच्या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येत आहे. ही कामे करीत असताना या विषयातील तज्ज्ञांचे वेळोवेळी मार्गदर्शन घेण्यात येत आहे. या मिसिंग लिंकवर 180 मीटर उंचीचा सर्वात उंच पूल आणि सर्वात जास्त रुंदीचा बोगदा बांधण्यात येत आहे. या प्रकल्पामुळे लोणावळा, खंडाळा परिसरातील वाहतूक कोंडी कमी होणार असून, प्रवाशांच्या वेळेत व इंधनात बचत होणार आहे. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग, यशवंतराव चव्हाण द्रुतगती महामार्ग मिसिंग लिंक प्रकल्प, नियोजित नागपूर-गोवा महामार्ग असे विविध महामार्ग पूर्ण करून वाहतूक कोंडीचा प्रश्न सोडविण्याचा शासनाचा प्रयत्न आहे. पाहणी पूर्वी कुसगाव येथे आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.

हेही वाचा :

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news