पुणे : पालकमंत्र्यांकडून मेट्रो स्थानकांची पाहणी

पुणे : पालकमंत्र्यांकडून मेट्रो स्थानकांची पाहणी
Published on
Updated on

पुणे : पुढारी वृत्तसेवा :  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मंगळवारी (दि.1) पुणे मेट्रोच्या फुगेवाडी ते सिव्हिल कोर्ट आणि गरवारे कॉलेज ते रुबी हॉल मार्गिकेचे लोकार्पण होत आहे. त्या पार्श्वभूमीवर राज्याचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी शनिवारी रुबी हॉल, सिव्हिल कोर्ट आणि शिवाजी नगर मेट्रो स्थानकांची पाहणी केली आणि रुबी हॉल स्थानक ते शिवाजी नगर मेट्रो स्थानकादरम्यान प्रवासदेखील केला.

या वेळी आमदार सिद्धार्थ शिरोळे, विभागीय आयुक्त सौरभ राव, मेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक श्रावण हर्डीकर, पुणे महानगरपालिका आयुक्त विक्रम कुमार, जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख, मेट्रोचे कार्यकारी संचालक डॉ. हेमंत सोनवणे यांच्यासह मुरलीधर मोहोळ, राजेश पांडे आदी उपस्थित होते. पाटील यांनी मेट्रो चालविणार्‍या महिला चालकाशी संवाद साधून त्यांचे अभिनंदन केले.

पालकमंत्री पाटील म्हणाले, या दोन मार्गांमुळे पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहर जोडले जाणार असून, पुणे शहरातील महत्त्वाच्या ठिकाणी प्रवासदेखील सुलभ होणार आहे. नवीन मार्ग शिवाजी नगर, सिव्हिल कोर्ट, आरटीओ, पुणे रेल्वे स्टेशन, पीएमसी, संभाजी उद्यान, डेक्कन इत्यादी महत्त्वाच्या भागांना जोडत असल्याने पुणेकर नागरिकांना याचा फायदा होणार आहे. तसेच, मेट्रो मार्गामुळे पुणेकरांना प्रवासाचा चांगला पर्याय उपलब्ध होणार असून, शहरातील वाहतूक कोंडी दूर होण्यास मदत होईल. नागरिकांना मेट्रो स्थानकापर्यंत
प्रवास करण्यासाठी इलेक्ट्रिक बस आणि पार्किंगची सुविधादेखील असणार आहे. त्यामुळे नागरिकांनी मेट्रोद्वारे प्रवास करावा, असे आवाहन त्यांनी केले.

हेही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news