Pune Innovate U Techathon 2026: ‘इनोव्हेट यू टेकॅथॉन 3.0 – 2026’ : राष्ट्रीय स्तरावरील हॅकेथॉनचे आयोजन

महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी नावीन्यपूर्ण संकल्पनांना वाव; 21-22 फेब्रुवारीला पुण्यात स्पर्धा, नोंदणी सुरू
Innovate U Techathon
Innovate U TechathonPudhari
Published on
Updated on

पुणे: महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमधील नावीन्यपूर्ण संकल्पनांना वाव देण्यासाठी आणि त्यांच्यातील उद्यमशीलतेला पाठबळ देण्याच्या उद्देशाने इनोव्हेशन फाउंडेशनच्या वतीने ‌‘इनोव्हेट यू टेकॅथॉन 3.0 2026‌’ या राष्ट्रीय स्तरावरील हॅकेथॉनचे आयोजन 21 आणि 22 फेबुवारी 2026 रोजी करण्यात आले असून, या हॅकेथॉनमध्ये सहभागी होण्यासाठीची ऑनलाइन नोंदणी प्रक्रिया सुरू झाली आहे, अशी माहिती इनोव्हेशन फाउंडेशनचे अध्यक्ष कल्पेश यादव यांनी दिली.

Innovate U Techathon
Pune Municipal Election Campaign: ‘वासुदेव आला हो…’ : महापालिका प्रचारात लोककलेचा नवा रंग

ही स्पर्धा ऑल इंडिया श्री शिवाजी मेमोरिअल सोसायटीच्या एआयएसएसएमएस इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी (आयओआयटी) महाविद्यालयात होणार आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून सामाजिक समस्यांवर तंत्रज्ञानाच्या साहाय्याने उपाय शोधून त्याचे उपाय समाजासमोर आणण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. इनोव्हेशन फाउंडेशनच्या वतीने आयोजित पत्रकार परिषदेत यादव बोलत होते. यंदा हॅकेथॉनचे तिसरे वर्ष असून, दरवर्षी स्पर्धा अधिक मोठ्या प्रमाणावर आयोजित करण्यात येत आहे. गेल्या वर्षी हॅकेथॉनमध्ये देशातील नामांकित इंजिनीअरिंग कॉलेजसह विविध व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या 400 पेक्षा अधिक महाविद्यालयांच्या संघाने सहभाग घेतला होता.

Innovate U Techathon
Pune Ward 25 Election Campaign: ज्येष्ठ नागरिकांसाठी ‘फिरते समस्या निवारण कार्यालय’ सुरू करणार : राघवेंद्र बाप्पु मानकर

हॅकेथॉनचे मधील विजेत्यांसाठी गटनिहाय लाखो रुपयांची रोख पारितोषिके प्रदान करण्यात येणार असून, सर्वाधिक नावीन्यपूर्ण आणि समाजोपयोगी प्रकल्पासाठी इनोव्हेशन अवॉर्ड देण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे एआय तंत्रज्ञानाचा प्रभावी व कल्पक वापर करणाऱ्या प्रकल्पांना विशेष प्रोत्साहन दिले जाणार आहे, असे यादव यांनी सांगितले. यादव म्हणाले, या उपक्रमाला सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषद, तंत्रशिक्षण संचलनालय, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, आयडीटीआर, रतन टाटा महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठ, डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान विद्यापीठ, लोणेरे; तसेच सीओईपी तंत्रशास्त्र विद्यापीठ यांचा पाठिंबा लाभला आहे.

Innovate U Techathon
Pune Construction Site Accident: पतंग उडवताना सहाव्या मजल्यावरून पडून 12 वर्षीय मुलाचा मृत्यू

विद्यार्थ्यांनी हॅकेथॉनमध्ये सहभागी होण्यासाठी इनोव्हेशन फाउंडेशनच्या ळपर्पेींरींर्शूेी. ळप या लिंकवर माहिती आणि शुल्क भरून 5 फेबुवारीपर्यंत नोंदणी करायची आहे. अधिकाधिक विद्यार्थ्यांनी हॅकेथॉनमध्ये सहभागी व्हावे; तसेच प्राध्यापक आणि प्राचार्यांनी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना स्पर्धेत सहभागी होण्यासाठी प्रोत्साहित करावे, असे आवाहन कल्पेश यादव यांनी केले.

Innovate U Techathon
Pune Preventive Police Action: महापालिका निवडणुकीपूर्वी पुण्यात मोठी कारवाई; 706 गुन्हेगारांवर प्रतिबंधात्मक आदेश

गटनिहाय हॅकेथॉन आणि पारितोषिके

हॅकेथॉनसाठी एड्युटेक, पर्यावरण, आरोग्यसेवा, ट्रॅफिक मॅनेजमेंट, आपत्ती व्यवस्थापन आणि ॲग््रािटेक अशा विषयांवरील समस्या देण्यात येणार असून, विद्यार्थ्यांना दिलेल्या वेळेत तंत्रज्ञानावर आधारित उपाय विकसित करावे लागणार आहेत. इंजिनीअरिंग, पॉलिटेक्निक, बीसीए, एमसीए, बी-टेक ॲग््राी आदी अभ्यासक्रमांचे विद्यार्थी 3 ते 4 जणांच्या गटाने या हॅकेथॉनमध्ये सहभागी होऊ शकतात. गटातील प्रत्येक विजेत्याला पारितोषिकाने गौरविण्यात येणार आहे, असे कल्पेश यादव यांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news