Velhe Mulshi Conservation Reserve: वेल्हे-मुळशी संवर्धन राखीव क्षेत्राला मंजुरी; सह्याद्रीच्या जैवविविधतेला मिळणार संरक्षण

५२० फुलझाडांच्या प्रजातींची नोंद; २४ प्रकारचे मासे, ७० हून अधिक फुलपाखरे आणि दुर्मीळ वन्यजीवांचा अधिवास
Sahyadri Biodiversity
Sahyadri BiodiversityPudhari
Published on: 
Updated on: 

सुनील जगताप

पुणे: वेल्हे-मुळशी संवर्धन राखीव क्षेत्राला मंजुरी मिळाल्याने सह्याद्री परिसरातील नैसर्गिक अधिवास आणि जैवविविधतेच्या संरक्षणाच्या दृष्टीने महत्त्वाचे पाऊल पडले आहे. या निर्णयामुळे परिसरातील वनसंपदा, वन्यजीवांचे अधिवास, पक्षीविश्व तसेच विविध प्रकारच्या वनस्पतींचे संवर्धन करण्याच्या प्रयत्नांना बळ मिळण्याची अपेक्षा वाढली आहे.

Sahyadri Biodiversity
Pune Robbery Case: पुण्यात भरदिवसा ३० लाखांची लूट; दरोड्याऐवजी ‘प्रॉपर्टी मिसिंग’ची नोंद!

वेल्हे-मुळशी परिसर सह्याद्रीच्या नैसर्गिक पर्यावरणाचा महत्त्वाचा भाग आहे. येथील जंगल, डोंगररांगा, झुडपी वनस्पती, गवताळ पट्टे आणि पाणवठे विविध सजीवांना पोषक अधिवास उपलब्ध करून देतात. संवर्धन राखीव क्षेत्राला मिळालेल्या मंजुरीच्या पार्श्वभूमीवर क्षेत्राची निश्चित व्याप्ती, समाविष्ट गावांच्या सीमा आणि संरक्षणासंबंधीच्या अटी यांची माहिती महत्त्वाची ठरणार आहे.

Sahyadri Biodiversity
Pune Cyber Blackmail Case: पुण्यात सायबर ब्लॅकमेलिंगमुळे तरुण इंजिनिअरने जीवन संपविले; बिहारमधून दोघांना अटक

संबंधित शासन निर्णय, अधिसूचना आणि नकाशांच्या आधारे या क्षेत्राची नेमकी व्याप्ती स्पष्ट होईल. संवर्धनाच्या उपाययोजना प्रभावीपणे राबवण्यासाठी वन विभाग, स्थानिक प्रशासन आणि ग्रामस्थ यांच्यात समन्वय असणेही आवश्यक आहे. या क्षेत्रातील जैवविविधतेचे प्रभावी संवर्धन करण्यासाठी वन्यजीव, पक्षी, सरपटणारे प्राणी आणि स्थानिक वनस्पतींचे शास्त्रीय सर्वेक्षण महत्त्वाचे ठरणार आहे. मंजुरीनंतर प्रत्यक्ष अंमलबजावणी कशा पद्धतीने होते, याकडे पर्यावरणप्रेमी आणि स्थानिक नागरिकांचे लक्ष लागले आहे.

Sahyadri Biodiversity
Pune Aapla Davakhana: पुण्यातील सहा ‘आपला दवाखाना’ पनवेल, कोल्हापूरला हलवले; जागेअभावी पुणेकरांचे नुकसान!

वनस्पती आणि नैसर्गिक संपदा

वृक्ष जैवविविधतेच्या बाबतीत हा प्रदेश अतिशय उच्च दर्जाचा असून ६६० प्रजातीच्या फुल झाडांपैकी ५२० प्रजातींची नोंद करण्यात आलेली आहे. वनात आढळणाऱ्या ४२० वृक्षांच्या प्रजातींपैकी २९० प्रजाती या पश्चिम घाटातील स्‍थानिक आहेत. या प्रदेशात गंभीर संकटात सापडेली सनई या फुलझाडाची नोंद करण्यात आली आहे. या प्रदेशात कर्दळ, जांभळा, तेरडा, पांढरी मुसळी, काप्रू, जंगली मुळी, सोनकी, निवळी, बरका अशा असंख्य वनस्‍पती आहेत.

२४ माशांच्या प्रजाती

या प्रदेशात ताज्‍या पाण्यातील २४ माशांच्या प्रजातींपैकी मरळ, कटला, रहू, शिवडा, वॉम्‍ब, चिलापी, डेगडा, वरडोकी इत्‍यादी प्रजातीचे मासे आढळले आहेत. त्याचबरोबर फुलपाखरांच्या ७० पेक्षा जास्‍त प्रजातींची नोंद झालेली आढळते. या भागात ३९ स्‍थानिक व दुर्मीळ असे प्राणी निदर्शनास येतात, तर अतिदुर्मीळ अशा १५ पक्ष्यांच्या प्रजाती आढळतात.

Sahyadri Biodiversity
AI In Animation: ॲनिमेशन क्षेत्रात एआयची क्रांती! चित्रांपासून व्हिडिओपर्यंत निर्मिती वेगवान; तरुणांसाठी नव्या संधी

वेल्हे-मुळशी संवर्धन राखीव क्षेत्राला मंजुरी मिळालेली असली तरी अद्याप त्‍याची अधिकृत अधिसूचना काढण्यात आलेली नाही. ही अधिसूचना मिळताच त्‍यामध्ये काय-काय करणे अपेक्षित आहे हे तज्ज्ञांशी चर्चा करून बैठकीमध्ये आम्‍ही निर्णय घेऊ.

शीतल राठोड, सहाय्यक वनसंरक्षक, भोर प्रादेशिक वन विभाग

राज्य वन्यजीव मंडळाच्या बैठकीत दोन अभयारण्य जाहीर केले असून, राज्यातील १४ वनक्षेत्रांना संवर्धन राखीव क्षेत्र म्‍हणून जाहीर केले आहे. ही वनसंपदा, तेथील प्राण्यांचा अधिवास आणि वनक्षेत्राच्या संवर्धनाच्या दृष्टीने उपयुक्‍त निर्णय आहे.

अनुज खरे, सदस्य, राज्य वन्यजीव मंडळ, वन्यजीव अभ्यासक

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news