Post Saving Scheme: पोस्टाच्या बचत योजनांमध्ये एकट्या पुणे विभागातच 12 हजार कोटीची गुंतवणूक; योजना कोणत्या, व्याजदर किती?

Indian Post Saving Sceme: सुरक्षित बचतीपासून डिजिटल बँकिंगपर्यंत पोस्ट ऑफिस बनले नागरिकांचे विश्वासार्ह आर्थिक केंद्र
India Post Saving Schemes
India Post Saving SchemesPudhari
Published on
Updated on

शिवाजी शिंदे, पुणे

भारतीय डाक विभागाने नागरिकांच्या बचत, गुंतवणूक आणि आर्थिक सक्षमी करणासाठी विविध योजना उपलब्ध करून दिल्या आहेत. या बचत योजनांचा उद्देश नागरिकांना सुरक्षित बचत, दीर्घकालीन गुंतवणूक आणि आधुनिक बँकिंगच्या प्रवाहात सहभागी करणे हा आहे. टपल कार्यालयाच्या या योजनांना सरकारी हमी असल्यामुळे नागरिकांचा विश्वास अधिकदृढ होताना दिसतोय. (Latest Pune News)

India Post Saving Schemes
Farm Loan Waiver: कर्जमाफी कधी? बच्चू कडूंच्या मागणीवर CM फडणवीसांचं मोठं विधान

भारतीय टपाल विभागाच्या पुणे प्रादेशिक विभागाच्या अंतर्गत येत असलेल्या पुणे, अहिल्यानगर, सातारा आणि सोलापूर या चार जिल्ह्यात 2023-24 या आर्थिक वर्षात सुमारे 9 लाख 66 हजारांपेक्षा जास्त आणि 2024-25 या आर्थिक (आतापर्यत ) सुमारे 11 लाख 49 हजार बचत खाती नागरिकांनी उघडली असून, या सेवेचा चार जिल्ह्यातील नागरिकांनी या सेवेचा लाभ घेत आहेत. सद्यस्थितीत एकूण 69 लाख 59 हजार बचत खाती चारही जिल्ह्यातील टपाल विभागात असून, या वेगवेगळ्या बचत खात्याच्यामाध्यमातून दरवर्षी कोट्यावधी रूपयांची उलाढाल होत असल्याचे दिसून आले आहे. दरम्यान चालू आर्थिक वर्षात सर्व योजनांची मिळून 12 हजार कोटी रूपयांची गुंतवणूक वेगवेगळ्या बचत योजनांमध्ये नागरिकांनी केलेली आहे.

India Post Saving Schemes
Street Lights Off: कोथरूड डी.पी. रस्त्यावर अंधाराचे साम्राज्य! पथदिवे बंद असल्याने नागरिकांत भीतीचे सावट

टपाल विभागाच्या बचत योजना कोणत्या?

नागरिकांना त्यांच्या गरजेनुसार निवडता येणार्‍या प्रमुख योजनांमध्ये पोस्ट ऑफिस सेव्हिंग बँक खाते, आवर्ती जमा (रिकरिंग डिपॉजिट), सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी (पीपीएफ), सुकन्या समृद्धी योजना (एसएसए), राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र (एनएससी), किसान विकास पत्र (केव्हीपी) आणि वरिष्ठ नागरिक बचत योजना (एससीएसएस ) यांचा समावेश आहे.

India Post Saving Schemes
Aditya L1: आदित्य-एल 1 मिशनकडून उघड झाले ‘ऊर्जेचे’ गुपित, सूर्याच्या अतिनील किरणोत्सर्गाचा हवामानावर होतोय प्रभाव

बचत खात्यावर 4 ते 8 टक्क्यांपेक्षा जास्त व्याजदर

सध्या पोस्ट ऑफिस बचत खात्यावर सुमारे 4 टक्के वार्षिक व्याजदर मिळतो. आवर्ती जमा (आरडी) योजनेत मासिक बचतीवर सुमारे 6.7 टक्के वार्षिक व्याज, तर मुदत ठेवींवर (टर्म डिपॉजिट) मुदतीनुसार 6.9 ते 7.5 टक्के व्याजदर लागू आहे. सुकन्या समृद्धी योजनेवर सुमारे 8.2 टक्के, पीपीएफवर 7.1 टक्के,एनएससी वर 7.7 टक्के,केव्हीपी वर 7.5 टक्के, मंथली इन्कम स्कीम (एमआयएस )वर 7.4 आणि वरिष्ठ नागरिक बचत योजनेवर 8.2 टक्के वार्षिक व्याजदर उपलब्ध आहे. (व्याजदर दर तीन महिन्यांनी बदलतात) या योजना केवळ सुरक्षित बचतीचा पर्याय नसून काही योजना करसवलतीस पात्र गुंतवणूक साधनेदेखील आहेत.

India Post Saving Schemes
Election Battle: खेड शिवापूर-खानापूर गटात पाच पक्षांची थेट लढत; राजकीय समीकरणे बदलणार?

टपाल विभागाचे बचत खाते झाले डिजिटल

गेल्या काही वर्षात टपाल विभागाने अत्याधुनिक डिजिटल युगाशी नाते जोडत ग्राहकांसाठी पेपरलेस केवायसी (ई-केवायसी) प्रक्रियेसह, आधार बायोमेट्रिक प्रमाणीकरण वापरण्यास सुरवात केली असून ग्राहकांना त्यांचे सिंगल पोस्ट ऑफिस सेव्हिंग्स बँक (पीओएसाबी) खाते उघडणे आणि सेव्हिंग्ज खात्यामध्ये सुरक्षित आणि जलद व्यवहार करणे यापुढे अगदी सोयीस्कर होणार आहे. ग्राहकसेवेचा दर्जा उंचावण्यासाठी आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करण्याच्या दिशेने पोस्ट विभागाने आधुनिक पोस्टल तंत्रज्ञान (एपीटी) आय.टी. 2.0 द्वारे आणखी एक महत्वाचे पाऊल टाकले आहे. नागरिकांना अधिक सुविधा देण्यासाठी इंडिया पोस्ट पेमेंट्स बँक मार्फत आता घरपोच बँकिंग सेवा सुरू करण्यात आल्या आहेत.

India Post Saving Schemes
Diana Pundole: पुण्याच्या डिएना पुंदोलेनं रचला इतिहास! Ferrari 296 GTS मध्ये रेस करणारी ठरली पहिली भारतीय महिला

या सेवांद्वारे ग्राहकांना घरबसल्या विविध बँकिंग सुविधा मिळतात - जसे की खात्यात रोख रक्कम जमा करणे, पैसे काढणे, फंड ट्रान्सफर करणे, वीज-पाणी-मोबाईल बिल भरणे, तसेच सुकन्या समृद्धी खाते आणि पी पी एफ खात्यात थेट पैसे भरण्याची सुविधा मिळते.आयपीपीबी खात्याशी जोडलेल्या पोस्ट ऑफिस बचत खातेधारकांना या माध्यमातून आपल्या खात्यातून पैसे काढणे, ठेवी करणे, आणि पोस्ट ऑफिसच्या विविध योजनांसाठी पेमेंट करणे शक्य झाले आहे. त्यामुळे ग्राहकांना बँकेत किंवा पोस्ट ऑफिसमध्ये वारंवार भेट देण्याची गरज उरत नाही.

India Post Saving Schemes
Yashwant Mane: अजित पवारांचे निकटवर्ती यशवंत माने भाजपमध्ये; मोहोळ-इंदापूरमध्ये ‘कमळा’ ला नवे बळ!

टपाल विभाग नागरिकांसाठी बचतीसोबतच आधुनिक बँकिंग सुविधा उपलब्ध करून देत आहे. आय पी पी बी मार्फत घरपोच बँकिंगमुळे ग्रामीण तसेच शहरी भागातील ग्राहकांना वेळेची आणि खर्चाची बचत होणार असून व्यवहार अधिक सुरक्षित, पारदर्शक आणि सुलभ होतील. या सर्व योजनांचा उद्देश नागरिकांना बचत, गुंतवणूक आणि डिजिटल व्यवहारांच्या मुख्य प्रवाहात आणणे हा मुख्य उद्देश आहे. नागरिकांनी आपल्या गरजेनुसार योग्य योजना निवडून नियमित बचत आणि गुंतवणूक करावी

अभिजीत बनसोडे, संचालक प्रादेशिक विभाग पुणे

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news