Aditya L1: आदित्य-एल 1 मिशनकडून उघड झाले ‘ऊर्जेचे’ गुपित, सूर्याच्या अतिनील किरणोत्सर्गाचा हवामानावर होतोय प्रभाव

सूर्याच्या किरणांचा परिणाम पृथ्वीवरील पॉवर ग्रीडपर्यंत – पुण्यातील आयुका शास्त्रज्ञांनी सादर केला जगासाठी महत्त्वाचा संशोधन डेटा
आदित्य-एल 1 मिशनकडून उघड झाले ‘ऊर्जेचे’ गुपित
आदित्य-एल 1 मिशनकडून उघड झाले ‘ऊर्जेचे’ गुपितPudhari
Published on
Updated on
Summary
  • सूर्य म्हणजे अवकाशातील मोठी नैसर्गिक प्रयोगशाळा

  • अवकाशातील 99%पेक्षाही जास्त वस्तुमान सूर्याचे

  • आदित्य-एल 1 मिशनकडून दुर्बिणीच्या

पुणे: सूर्यावरील अतिनील किरणांचा प्रभाव पृथ्वीवरील पॉवर ग्रीडवर दररोज होतो. त्यामुळे आपल्या विज यंत्रणेचे गुपित सूर्याने आपल्याकडे ठेवले आहे.सूर्य म्हणजे अवकाशातील मोठी नैसर्गिक प्रयोगशाळा असून त्याच्या पोटात अनेक गुपिते दडली आहेत असा निष्कर्ष आदित्य एल-1चे निरीक्षण करणाऱ्या शस्त्रज्ञानी काढला आहे. (Latest Pune News)

आदित्य-एल 1 मिशनकडून उघड झाले ‘ऊर्जेचे’ गुपित
Election Battle: खेड शिवापूर-खानापूर गटात पाच पक्षांची थेट लढत; राजकीय समीकरणे बदलणार?

आदित्य-एल-1 अंतराळ वेधशाळेवरील प्राथमिक पेलोडपैकी एक - सोलर अल्ट्राव्हायोलेट इमेजिंग टेलिस्कोप ( सूट ), ने जागतिक संशोधन समुदायासाठी नुकताच कॅलिब्रेटेड विज्ञान- डेटाचा पहिला संपूर्ण संच जारी केला आहे. यात हे निष्कर्ष शस्त्रज्ञानी नोंदवले आहेत.पुण्यातील आयुका संस्थेतील शास्त्रज्ञ प्रा.दुर्गेश डॉ. त्रिपाठी आणि प्रा. डॉ.ए. एन. रामप्रकाश यांनी हे निष्कर्ष काढले आहेत.

आदित्य-एल 1 मिशनकडून उघड झाले ‘ऊर्जेचे’ गुपित
Diana Pundole: पुण्याच्या डिएना पुंदोलेनं रचला इतिहास! Ferrari 296 GTS मध्ये रेस करणारी ठरली पहिली भारतीय महिला

भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने (इस्रो) 2 सप्टेंबर 2023 रोजी प्रक्षेपित केलेली आदित्य-एल-1 ही भारतातील पहिली समर्पित सौर वेधशाळा आहे, जी कठोर क्ष-किरणांपासून इन्फ्रारेडपर्यंत अभूतपूर्व आणि विस्तृत वर्णक्रमीय (ऊर्जा) श्रेणीत सूर्याचा अभ्यास करते. या सकट ती सूर्यापासून येणारऱ्या अति उर्जावान कणांचा देखील अभ्यास करते. या साठी त्यावर सात उपकरणे लावलेली आहेत.

आदित्य-एल 1 मिशनकडून उघड झाले ‘ऊर्जेचे’ गुपित
Yashwant Mane: अजित पवारांचे निकटवर्ती यशवंत माने भाजपमध्ये; मोहोळ-इंदापूरमध्ये ‘कमळा’ ला नवे बळ!

भौतिकशास्त्रात प्रथमच,सूट ने निकट- आणि मध्य-अतिनील तरंगलांबी बँड (200 ते 400 नॅनोमीटर) मध्ये सूर्याचे निरीक्षण प्रदान केले.

जून 2024 पर्यंत पूर्ण झालेल्या कठोर पडताळणी आणि कॅलिब्रेशन टप्प्यानंतर, डेटा आता पूर्णपणे प्रक्रिया केलेला आहे आणि वैज्ञानिक वापरासाठी तयार आहे. सूट टीमने पदवी आणि पदव्युत्तर विद्यार्थ्यांसाठी आदित्य सायन्स सपोर्ट सेलच्या सहकार्याने देशभरातील विविध संस्थांमध्ये ही निरीक्षणे समजून घेण्यात आणि त्यांचे विश्लेषण करण्यात मदत करण्यासाठी अनेक कार्यशाळा आयोजित केल्या आहेत.

आदित्य-एल 1 मिशनकडून उघड झाले ‘ऊर्जेचे’ गुपित
Ajit Pawar Vighnahar Sugar Factory: विघ्नहर साखर कारखान्याच्या 40व्या गळीत हंगामाचा शुभारंभ अजित पवार यांच्या हस्ते

1 जून 2024 पासून सुरू होणारा संपूर्ण डेटासेट आता इस्रो सायन्स डेटा आर्काइव्ह द्वारे सार्वजनिकरित्या उपलब्ध आहे हे जाहीर करताना आम्हाला आनंद होत आहे. असे प्रथमच निवेदन आयुकाच्या वतीने शस्त्रज्ञानी केले आहे.

इन्स्ट्रुमेंट, कॅलिब्रेशन पद्धती आणि प्रथम विज्ञान परिणामांचे वर्णन करणारे तपशीलवार पेपर प्रकाशित केले गेले आहेत.

आदित्य-एल 1 मिशनकडून उघड झाले ‘ऊर्जेचे’ गुपित
Murder Case: मोटारीत गळा चिरून तरुणाची निर्घृण हत्या; दोघांना अटक

सूर्याचे तापमान बाहेरच्या थरात म्हणजे कोरोना मध्ये एक ते तीन दशलक्ष डिग्री सेल्सिअस इतके आहे. तर खालच्या थरात 5 ते 10 हजार डिग्री सेल्सिअस इतके आहे. सूर्यावर अनेक वेळा सौर वादळे तयार होतात तेथून निघणारे बारीक कण (पार्टिकल) प्रोटॉन, इलेक्ट्रॉन यात हायड्रोजन हेलियम, कार्बन असे अनेक घटक असतात ते कण पृथ्वीवर येऊन पावर ग्रीड सिस्टीमवर प्रभाव टाकू शकतात.त्यामुळे अशा वादळांचे अंदाज देता येणे शक्य होणार आहे. सूर्य हा सूर्यमालेतील सर्वात मोठा ग्रह असल्यामुळे त्याचे वस्तुमान इतर ग्रहांच्या तुलनेत 99% जास्त आहे.सूर्यावरील वादळामुळे ग्लोबल वॉर्मिंगसह वातावरणातील मोठे बदल होत आहेत. मात्र मान्सून पॅटर्नवर सूर्याच्या वातावरणाचा काय परिणाम होत आहे? याचे थेट पुरावे अजून मिळालेले नाहीत. तरी क्लायमेट चेंज हा विषय सूर्याशी निगडित आहे असे म्हणता येईल. आपल्या आकाशगंगेत 100 अब्ज तारे आहेत त्यांचा अभ्यास सूर्या वरच्या अभ्यासामुळे करणे शक्य होणार आहे.

डॉ.ए. एन. रामप्रकाश,आयुका,पुणे

शास्त्रज्ञानी काढलेले महत्वाचे निष्कर्ष...

  • सूर्यमालेतील 99% पेक्षा जास्त वस्तुमान असलेला सूर्य, प्लाझ्मा भौतिकशास्त्रासाठी नैसर्गिक प्रयोगशाळा म्हणून काम करतो.

  • त्याचे वातावरण खगोल भौतिकशास्त्रातील बरीच आश्चर्यजनक रहस्ये सादर करते.

  • जसे की कोरोनल हीटिंग समस्या म्हणजेच सूर्याच्या थंड पृष्ठभागाच्या थरांच्या वर दशलक्ष-डिग्री तापमान असलेल्या कोरोनाचे अस्तित्व.

  • सूर्यापासून होणारे अतिनील किरणोत्सर्ग आणि ऊर्जावान उद्रेक अवकाशातील हवामानावर प्रभाव पाडतात.

  • ज्यामुळे उपग्रह, नेव्हिगेशन प्रणाली आणि पृथ्वीवरील पॉवर ग्रिडवरही परिणाम होतो. -त्यामुळे या प्रक्रिया समजून घेणे केवळ मूलभूत विज्ञानासाठीच नव्हे तर अवकाश-आधारित आणि जमिनीवर आधारित प्रणालींच्या सुरक्षेसाठीही महत्त्वाचे आहे.

  • सुटचे चे आणखी एक प्रमुख उद्दिष्ट म्हणजे 200 ते 400 नॅनोमीटर मधील सौर किरणोत्सर्गाचा अभ्यास करणे.

  • सन–क्लायमेट कनेक्शनला प्रतिबंधित करणे आणि प्रथमच सौर फ्लेअर्स दरम्यान उर्जेच्या वर्णक्रमीय वितरणाची तपशीलवार तपासणी करण्यास अनुमती देणे आहे.

  • या अद्वितीय क्षमतेमुळे सौर उद्रेकांचे भौतिकशास्त्र आणि त्यांच्या उर्जे बद्दल नवीन अंतर्दृष्टी प्रदान करणे अपेक्षित आहे.

आदित्य-एल 1 मिशनकडून उघड झाले ‘ऊर्जेचे’ गुपित
MHADA Pune Housing Lottery 2025: म्हाडातर्फे 4,186 सदनिकांची विक्री; अर्जप्रक्रियेला या तारखेपर्यंत मुदतवाढ

मिशन बद्दल

  • इस्रो च्या पाठिंब्याने इंटर-युनिव्हर्सिटी सेंटर फॉर अॅस्ट्रॉनॉमी अँड अॅस्ट्रोफिजिक्स (आयुका), पुणे यांच्या नेतृत्वाखाली सूट विकसित झाले आहे.

  • यामध्ये सीईएसएसआय, आयसर,कोलकाता (एमई) इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ अॅस्ट्रोफिजिक्स (आयआयए), मणिपाल अकादमी ऑफ हायर एज्युकेशन, मॅक्स प्लँक इन्स्टिट्यूट फॉर सोलर सिस्टीम रिसर्च आणि तेजपूर विद्यापीठ यांचा समावेश आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news