Indapur Crime: वृद्ध नातेवाईकाचा 17 वर्षांच्या मुलीवर बलात्कार, 3 महिन्यांची गर्भवती राहिल्यानंतर संतापनजक घटना उघड

इंदापूर तालुक्यातील संतापजनक घटना; वालचंदनगर पोलिसांनी आरोपीला अटक, परिसरात संतापाची लाट
Crime Against Women
Crime Against WomenPudhari
Published on
Updated on

शेळगाव: शेळगाव (ता. इंदापूर) येथील एक १७ वर्षीय अल्पवयीन पीडितेवर तिच्याच वृद्ध नातेवाईकाने बलात्कार केला. याप्रकरणी पोलिस तक्रारीनंतर नराधम नातेवाईकाच्या मुसक्या वालचंदनगर पोलिसांनी आवळल्या. या घटनेबद्दल शेळगाव परिसरातून संताप व्यक्त होत आहे. आरोपी नातेवाईकावर विविध कलमातंर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहे. (Latest Pune News)

Crime Against Women
Post Saving Scheme: पोस्टाच्या बचत योजनांमध्ये एकट्या पुणे विभागातच 12 हजार कोटीची गुंतवणूक; योजना कोणत्या, व्याजदर किती?

वालचंदनगर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शेळगाव येथे पीडित मुलगी आपल्या कुटुंबियांसमवेत संबंधित वृद्ध नातेवाईकाच्या घराजवळ सन २००८ पासून राहत आहे. पीडितेच्या नातेवाईकाचे तिच्या घरी सतत ये-जा होती. मागील १० दिवसांपूर्वी पीडिता ही मावशीकडे आली व माझ्या पोटात दुखत असून मला मासिक पाळी येत नाही असे तिने सांगितले. सोमवारी (दि. २७) मावशीने पीडितेला इंदापूर शासकीय रुग्णालयात नेले.

Crime Against Women
Farm Loan Waiver: कर्जमाफी कधी? बच्चू कडूंच्या मागणीवर CM फडणवीसांचं मोठं विधान

तेथे तपासणी केली असती ती तीन महिन्याची गर्भवती असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. पीडितेस मावशीने या घटनेबाबत विचारणा केली असता तिने सांगितले की, मागील तीन महिन्यांपूर्वी आपले एक नातेवाईक दुपारी घरी आले होते. त्यांनी माझ्यावर जबरदस्ती केली. शिवाय या घटनेबद्दल कुणाला सांगितले तर तुझा आई-वडिलांना मारून टाकेन, अशी धमकी दिली. धमकी दिल्यामुळे पीडितेने या प्रकाराबदल कोणाला सांगितले नाही. परंतु पीडितेला त्रास होऊ लागल्याने हा प्रकार घडकीस आला. या प्रकारबद्दल शेळगाव परिसरातून तीव्र संताप व्यक्त होत असून या घटनेची फिर्याद पीडितेच्या आईने दिली.

Crime Against Women
Street Lights Off: कोथरूड डी.पी. रस्त्यावर अंधाराचे साम्राज्य! पथदिवे बंद असल्याने नागरिकांत भीतीचे सावट

संबंधित नराधम वृद्ध नातेवाईक आरोपीस पोलिसांनी अटक केली असून न्यायालयात उपस्थित केले असतात त्याला १ नोव्हेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news