Indapur Dairy Farmers: दुष्काळात दूध उत्पादकांना उसाच्या वाढ्याचा आधार; इंदापूरमध्ये हिरव्या चाऱ्याची मुबलक उपलब्धता

साखर कारखान्यांचा गळीत हंगाम वेगात; उसाच्या वाढ्याची एक पेंढी ५ ते ६ रुपयांना, दूध उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा
Animal Fodder
Animal FodderPudhari
Published on: 
Updated on: 

बावडा: इंदापूर तालुक्यामध्ये सध्या साखर कारखान्यांच्या गळीत हंगामांनी चांगलाच वेग घेतला आहे. त्यामुळे जनावरांसाठी उसाचे वाढे मुबलक प्रमाणावर उपलब्ध होत आहेत. परिणामी, सध्या दुष्काळामुळे दूध उत्पादक शेतकऱ्यांना उसाच्या वाढ्याचा मोठा आधार मिळत असल्याचे चित्र दिसून येत आहे.

Animal Fodder
Pune Sugarcane Crushing: पुणे जिल्ह्यात १३ साखर कारखान्यांचे ३४.६२ लाख टन ऊस गाळप; सोमेश्वरचा साखर उतारा सर्वाधिक

इंदापूर तालुक्यामध्ये निरा-भीमा, कर्मयोगी शंकररावजी पाटील, छत्रपती, बारामती ॲग्रो हे साखर कारखाने आहेत. हे कारखाने चालू असतानाच्या कालावधीत इंदापूर तालुक्यातील दूध उत्पादकांना गोठ्यातील दुभत्या जनावरांसाठी हिरवा चारा म्हणून ऊसवाढे सहजपणे जागोजागी उपलब्ध होत आहेत, असे लाखेवाडीचे ग्रामपंचायत सदस्य काशिनाथ अनपट (रेडा), रणजित गिरमे (बावडा), रामभाऊ पाटील (चाकाटी) यांनी सांगितले.

Animal Fodder
Ghod Dam Sand Smuggling: घोड धरणात वाळूमाफियांवर मोठी कारवाई! १७ यांत्रिक बोटी जिलेटिनच्या स्फोटात उद्ध्वस्त

ऊस उत्पादक शेतकरी शेतातूनच उसाचे वाढे ऊसतोडणी कामगारांकडून खरेदी करीत आहेत. जनावरांच्या गोठ्याजवळच ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर अथवा बैलगाडीतून हे वाढे दूध उत्पादकांना उपलब्ध होत आहेत. उसाच्या वाढ्याची एक पेंढी सुमारे ५ ते ६ रुपयांना विकली जात आहे.

Animal Fodder
Sinhgad Education Society Schools: सिंहगड संस्थेला मोठा धक्का! पुण्यातील १३ शाळांवर प्रशासक नियुक्त

साखर कारखान्याच्या कार्यस्थळावरून दूध उत्पादक शेतकरी, युवक हे दुचाकीने उसाचे वाढे घेऊन येत असल्याचे चित्र सध्या पाहायला मिळत आहे. दूध उत्पादक शेतकऱ्यांनी जनावरांना शरीर पोषणासाठी उसाच्या वाढ्याबरोबर मिनरल मिक्सर हे खाण्यास द्यावे, असे आवाहन दूधगंगा दूध उत्पादक सहकारी संघाचे उपाध्यक्ष विक्रांत कोरटकर (वकीलवस्ती), रमजान शेख (बावडा) आणि विलासराव ताटे-देशमुख (निरा नरसिंहपूर) यांनी केले आहे.

Animal Fodder
Pune Court Employees Strike: पुणे जिल्हा न्यायालयाचे कामकाज ठप्प! ३५ हजार न्यायालयीन कर्मचाऱ्यांचा बेमुदत संप

इंदापूर तालुका दूध उत्पादनात अग्रेसर

इंदापूर तालुका दूध उत्पादनात राज्यामध्ये अग्रेसर म्हणून ओळखला जात आहे. सुशिक्षित बेरोजगार युवक, महिला, शेतमजूर आदी समाजातील सर्वच घटक या दूधधंद्यात सक्रिय असून, तालुक्यातील हजारो कुटुंबांमध्ये दूधधंद्यामुळे आर्थिक सुबत्ता निर्माण झाली आहे, असे रमेश काकडे आणि हरिश्चंद्र काकडे (बावडा) यांनी नमूद केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.