पीएमपीच्या पिंपरी-चिंचवडमधील मेट्रो फीडर सेवेचे उद्घाटन

पीएमपीच्या पिंपरी-चिंचवडमधील मेट्रो फीडर सेवेचे उद्घाटन
पुणे : पीएमपी प्रशासनाकडून मेट्रोच्या प्रवाशांकरिता फीडर सेवा पुरविण्याचे नियोजन करण्यात आले आहे. बुधवारी पुण्यातील फीडर सेवेचे उद्घाटन करण्यात आले तर गुरुवारी (दि. 4) रोजी पिंपरी-चिंचवड येथील फीडर सेवेचे उद्घाटन करण्यात आले. त्यामुळे पिंपरी-चिंचवड भागातून प्रवास करणार्‍या प्रवाशांना दिलासा मिळाला आहे. दुसर्‍या टप्प्यातील मेट्रो मार्ग पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन झाल्यानंतर नुकतेच सुरू करण्यात आले आहेत. त्यानंतर आता फीडर सेवा सुरू करण्याचे नियोजन सुरू आहे.
पीएमपीचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक सचिंद्र प्रताप सिंह व पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त शेखर सिंह यांच्या हस्ते मेट्रोच्या पिंपरी-चिंचवड महानगरपालिका स्थानक येथे वातानुकूलित ई-बसला हिरवा झेंडा दाखवून सुरुवात करण्यात आली. या वेळी पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त उल्हास जगताप, उपायुक्त रविकिरण घोडके, सह-शहर अभियंता प्रमोद ओभांसे, कार्यकारी अभियंता बापूसाहेब गायकवाड, कार्यकारी अभियंता संध्या वाघ, मेट्रोचे सिस्टम्स अ‍ॅन्ड ऑपरेशनचे संचालक विनोदकुमार अग्रवाल, डी.जी.एम. मनोज डॅनियल, पुणे महानगर परिवहन महामंडळाचे चीफ ट्रान्सपोर्ट मॅनेजर (ऑपरेशन) सतीश गव्हाणे, कामगार व जनता संपर्क अधिकारी सतीश गाटे, वाहतूक नियोजन संचलन अधिकारी नारायण करडे, डेपो मॅनेजर यशवंत हिंगे, सुनील दिवाणजी व भास्कर दहातोंडे उपस्थित होते.

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news