राज्यात मंगळवारपासून पावसाचा जोर ओसरणार | पुढारी

राज्यात मंगळवारपासून पावसाचा जोर ओसरणार

पुणे; पुढारी वृत्तसेवा : राज्यात सोमवारनंतर (दि.7) पावसाचा जोर ओसरण्याची शक्यता आहे. दरम्यान, गुरुवारी दुपारी छत्तीसगडमध्ये कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याने शुक्रवारी कोकण व मध्य महाराष्ट्रात, तर 5 ते 7 ऑगस्टदरम्यान विदर्भात मध्यम ते मुसळधार
पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

राज्यातील पाऊस कमी होत असताना गुरुवारी दुपारी छत्तीसगडमध्ये कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले. तसेच अरबी समुद्र व बंगालच्या उपसागरात वार्‍याची गती वाढल्याने छत्तीसगड, मध्यप्रदेश व उत्तर प्रदेशात पुन्हा मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता आहे. कोकण व मध्यमहाराष्ट्रात 4, तर विदर्भाला 5 ते 7 ऑगस्टदरम्यान मध्यम ते मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

असे आहेत अलर्ट…

  • कोकण आणि मध्य महाराष्ट्र : 4 ऑगस्ट : यलो
  • विदर्भ : 5 ते 7 ऑगस्ट : यलो

हेही वाचा

नागपूर : सव्वा कोटी लुटणारे दोन आरोपी गजाआड

सोलापूर : लज्जास्पद कृत्य केल्याने बहिणीची सावत्र भावासह पाच जणांविरोधात तक्रार; गुन्हा दाखल

Manipur Violence : मणिपुरात दोन जमावांचा परस्परांवर गोळीबार; १७ जखमी

Back to top button