Pune News : पावती हरवाल तर वस्तूंसह भरपाईला मुकाल

Pune News : पावती हरवाल तर वस्तूंसह भरपाईला मुकाल
Published on
Updated on

पुणे : अ‍ॅमॅझॉन या ऑनलाईन संकेतस्थळावरून अयान यांनी सात रेनकोट खरेदी केले. आठवडाभरात त्यांनी ते रेनकोट कंपनीला परत केले. मात्र, ते कंपनीपर्यंत पोहोचू शकले नाही. तांत्रिक कारणामुळे गोदामात रेनकोट पडून राहिल्याने अयान यास रेनकोटचे पैसे परत मिळाले नाहीत. याप्रकरणी त्याने ग्राहक आयोगात दाद मागितली. अयानकडून वस्तू खरेदी केल्याची पावती, ऑनलाईन ऑर्डरची प्रत आदी कागदपत्रे दाखल केली नाहीत. त्यामुळे अयान व कंपनीमध्ये ग्राहक व सेवा पुरवठादार संबंध सिद्ध होत नाहीत, असा निष्कर्ष काढत ग्राहक आयोगाने नुकसान भरपाईची मागणी फेटाळून लावली.

अयान सिद्दीकी यांनी 27 जून 2022 रोजी अ‍ॅमॅझॉनच्या संकेतस्थळावरून 13 हजार 363 रुपये मोजून सात रेनकोट खरेदी केले. त्यानंतर, 2 जुलै रोजी त्यांनी ते कंपनीला परत केले. मात्र, त्याची नोंद कंपनीच्या संकेतस्थळावर न झाल्याने त्यांनी याबाबत कंपनीकडे तक्रार केली. त्यावर कंपनीकडून 15 दिवसांची वाट पाहण्यास सांगून वस्तू मिळताच आपणास कळविण्यात येईल, असे सांगण्यात आले.

3 ऑगस्ट रोजी कंपनीने अयान यांना संपर्क करीत कंपनीला वस्तू मिळाल्या नसल्याने रेनकोटची रक्कम परत करता येणार नसल्याचे सांगितले. त्यानंतर, अयान यांनी रेनकोट पिकअप करणार्‍या विकास यांच्याशी संपर्क केला. त्या वेळी, रेनकोटची पाकिटे कंपनीच्या गोदामात पडून असून, तांत्रिक कारणामुळे ती कंपनीपर्यंत पोहोचू शकले नसल्याचे सांगत विकास यांनी पाकिटांचे फोटो अयान यांना पाठविले.

त्याधारे अयान यांनी ग्राहक आयोगात धाव घेत रेनकोटसाठीचे 13 हजार 360 रुपये व नुकसान भरपाईपोटी 30 हजार रुपये तसेच तक्रार खर्च देण्याची मागणी केली. कंपनीकडून कोणताही प्रतिसाद न मिळाल्याने आयोगाकडून हे प्रकरण एकतर्फी चालविण्यात आले. अयान यांनी वस्तू खरेदी केल्याची पावती, कागदपत्रे तक्रार अर्जासोबत दाखल केली नाहीत. त्यामुळे, अयान यांनी स्वत: कंपनीकडून खरेदी केल्याचे सिध्द होत नाही. परिणामी, त्यांमध्ये ग्राहक व सेवा पुरवठादार हे नाते निर्माण होत नाही. आयोगाचे अध्यक्ष जे. व्ही. देशमुख व सदस्य शुभांगी दुनाखे यांनी तक्रार अर्ज फेटाळून लावला.

नोटीस नाकारल्याने एकतर्फी खटला

ग्राहक आयोगामार्फत अयान यांनी अ‍ॅमॅझान कंपनीला नोटीस पाठविली. मात्र, कंपनीने ती स्वीकारण्यास नकार दिल्याने रिफ्युज्ड या शेर्‍याने ती परत आली. त्यामुळे, आयोगाने कंपनीला नोटीस बजावणी झाल्याचे गृहित धरून कंपनीविरोधात 16 मे 2023 रोजी आदेश काढून हे प्रकरण एकतर्फी मिटवले.

हेही वाचा

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news