‘होम मिनिस्टर-जागर स्त्रीशक्तीचा’मध्ये रमल्या शिक्षिका

‘होम मिनिस्टर-जागर स्त्रीशक्तीचा’मध्ये रमल्या शिक्षिका
Published on
Updated on
पुणे : शिक्षिकांचा उत्स्फूर्त सहभाग, स्पर्धेतील उत्साह, त्यांनी दाखविलेली आपली चमक, पारंपरिक वेशभूषेत त्यांनी नोंदविलेला सहभाग आणि यानिमित्ताने आयोजिलेले सांस्कृतिक कार्यक्रम… अशा आनंद व उत्साहात 'होम मिनिस्टर-जागर स्त्रीशक्तीचा' हा कार्यक्रम शनिवारी रंगला. पुढारी कस्तुरी क्लब आणि राज्य प्राथमिक शिक्षक संघ महिला आघाडीने हा आगळावेगळा कार्यक्रम आयोजित केला होता. त्यात सुमारे 500 शिक्षिका सहभागी झाल्या होत्या.
पुढारी कस्तुरी क्लबतर्फे महिलांसाठी नेहमीच विविध कार्यक्रम आयोजित केले जातात. नवरात्र उत्सवानिमित्त खास महिला शिक्षिकांसाठी हा कार्यक्रम घेण्यात आला. सर्व महिलांनी पिवळी किंवा लाल रंगाची काठापदराची साडी आणि पारंपरिक वेशभूषा करून हिरिरीने सहभाग घेतला. त्यांचा उत्साह वाखाणण्याजोगा होता. संपूर्ण पुणे शहरातील शिक्षिकांसाठी हा कार्यक्रम राजीव गांधी ई-लर्निंग स्कूलमधील साहित्यसम—ाट विजय तेंडुलकर नाट्यगृहात झाला. अभिनेत्री मेघना झुझम यांनी या कार्यक्रमात बहार आणली.
शिक्षिकांसाठी विविध स्पर्धा झाल्या. 'शेवानी सारीज्'कडून प्राजक्ता पाटील यांना मानाची पैठणी देण्यात आली. या वेळी शिक्षिकांनी कस्तुरी सदस्यत्वाची नोंदणीही केली आणि क्लबच्या कार्यक्रमातील सहभागाचा निर्धार व्यक्त केला. संस्थेच्या पुणे शहर महिलाध्यक्षा मिलन जंगम, राज्य अध्यक्ष सचिन डिंबळे, वर्षा उगलमुगले, सुनीता व्हावळ, संगीता बागूल यांच्यासह गजानन फाउंडेशनच्या मृणाल पटवर्धन यांचे विशेष सहकार्य लाभले.
अतिशय सुंदर कार्यक्रम होता. पुढारी कस्तुरी क्लबने खूप चांगले नियोजन केले. स्त्रीशक्तीचा जागर असल्याने शेवानी सारीज् या कार्यक्रमात सहभागी झाले. शेवानी सारीज् नेहमीच कस्तुरी क्लबसोबत कार्यक्रमात सहभागी होईल.
– सुरेश शेवानी, शेवानी सारीज्
पुढारी कस्तुरी क्लबसोबत मी अनेक वर्षे काम करीत आहे. त्यांचे सगळेच कार्यक्रम चांगले असतात. पुढेही माझा कार्यक्रमांमध्ये सहभाग असेल.
– मृणाल पटवर्धन, गजानन फाउंडेशन
कस्तुरी क्लबसोबत आमच्या शिक्षिका नेहमीच असतील. खूप सुंदर कार्यक्रमाचे आयोजन केले होते. आमच्या अनेक शिक्षिका कस्तुरीच्या सदस्या झाल्या. आम्ही सर्वांनी या कार्यक्रमाचा आनंद लुटला.
– मिलन जंगम, कार्याध्यक्ष, 
राज्य प्राथमिक शिक्षक संघ 
महिला आघाडी
हेही वाचा

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news