सराईत गुन्हेगार रोहन जगताप पुण्यातून सहा महिन्यांकरीता तडीपार

सराईत गुन्हेगार रोहन जगताप पुण्यातून सहा महिन्यांकरीता तडीपार

पुणे : पुढारी वृत्तसेवा : पुणे शहरातील बिबवेवाडी व भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल असलेल्या सराईतावर परिमंडळ पाचच्या पोलिस उपआयुक्त नम्रता पाटील यांंनी सहा महिन्यांची तडीपारीची कारवाई केली. रोहन राजन जगताप (वय 21, रा.गल्ली नं. 02, काकाडेवस्ती, कोंढवा बुद्रुक पुणे) असे तडीपार केलेल्या गुंडाचे नाव आहे.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, बिबवेवाडी व भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन हद्दित दहशत माजवत आणि लोकांना दमदाटी करत लुटणार्‍या रोहन जगताप याची दहशत वाढत चालली होती. सामान्य नागरिकांना वेठीस धरणार्‍या जगतापवर प्रतिबंधात्मक कारवाई करून देखील त्याने पुन्हा शरीराविरुध्द व मालाविरुध्द सारखे गंभीर स्वरुपाचे गुन्हे केले. त्यामुळे बिबवेवाडी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक विलास सोंडे गुन्हे निरीक्षक अनिता हिवरकर यांनी जगतापच्या तडीपारीचा प्रस्ताव तयार केला होता. हा प्रस्ताव सहाय्यक पोलीस आयुक्त राजेंद्र गलांडे यांच्या मार्फत उपायुक्त नम्रता पाटील यांच्याकडे सादर केला होता. त्यानंतर ही तडीपारीची कारवाई करण्यात आली.

बिबवेवाडी पोलीसांनी कायदा-सुव्यवस्थेकामी तडीपार करण्यात आलेला सराईत गुन्हेगार रोहन राजन जगताप हा तडीपार कालावधीमध्ये तडीपारी आदेशाचा भंग करून पुणे शहरात किंवा बिबवेवाडी परिसरात दिसुन आल्यास तात्काळ बिबवेवाडी पोलीस स्टेशन किंवा पुणे पोलीस नियंत्रण कक्ष येथे माहीती द्यावी असे आवाहन बिबवेवाडी पोलीस स्टेशन वरिष्ठ पोलीस निरीक्षक विलास सोंडे यांंनी नागरिकांना केले आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news