पुणे : सराईत गुन्हेगार जोशी 2 वर्षासाठी तडीपार

file photo
file photo

पुणे : पुढारी वृत्तसेवा : शिवाजीनगर गावठाण परिसरात दहशत माजवत शारीरिक इजा पोचवून जनतेला वेठीस धरुन पोलीसांच्या शासकीय कामात अडथळा निर्माण करण्यासारखे गंभीर स्वरूपाचे गुन्हे करणाऱ्या सराईताला परिमंडळ 1 च्या पोलीस उपायुक्त डॉ. प्रियंका नारनवरे यांनी त्याला दोन वर्षाकरिता तडीपारीचे आदेश दिले आहेत. समीर जयवंत जोशी (वय 26, रा.जोशी आळी शिवाजीनगर गावठाण पुणे) असे शिवाजीनगर पोलीसांनी तडीपार करण्यात आलेल्या सराईत गुन्हेगाराचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी जोशी हा सराईत गुन्हेगार आहे. त्याच्यावर शासकीय कामात अडथळा आणल्याचे दोन गंभीर गुन्हे दाखल आहेत. त्याने त्याच्या इतर साथीदारांच्या मदतीने शिवाजीनगर गावठाण परिसरात दहशत माजवणे, शारीरिक इजा पोचवून नागरिकांना वेठीस धरणे व पोलीसांच्या शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याचे गंभीर स्वरूपाचे गुन्हे केले आहेत. तसेच आरोपींनी शिवाजीनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीत वारंवार गुन्हे केल्याचे निष्पन्न झाले आहे.

त्याला वारंवार समज देऊनही त्याच्या वर्तवणूकीत कोणतीही सुधारणा होत नसल्याने त्याच्या गुन्हेगारी प्रवृत्तीमुळे नागरीक त्याच्या विरोधात तक्रार देण्यासाठी पुढे येत नव्हते. शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद माने, सहाय्यक पोलीस निरीक्षक भोलेनाथ अहिवळे, पोलीस उपनिरीक्षक भैरवनाथ शेळके, पोलीस अंमलदार राहुल होळकर यांनी सराईत गुन्हेगार समीर जयवंत जोशी यांच्या विरोधात तडीपारीचा प्रस्ताव तयार करून तो सहाय्यक पोलीस आयुक्त रमाकांत माने यांच्यामार्फत सादर केला होता. त्यावर जोशी याला दोन वर्षासाठी तडीपार करण्यात आले.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news