Haveli Farmers Land Reservation Protest: अकरा गावांतील शेतकऱ्यांचा विकास आराखड्याविरोधात संताप: आरक्षणामुळे होणार भूमिहीन!

हवेली कृती समितीचा सरकारला इशारा — सरकारी जमिनींवर विकासकामे करा, अन्यथा तीव आंदोलन
अकरा गावांतील शेतकऱ्यांचा विकास आराखड्याविरोधात संताप: आरक्षणामुळे होणार भूमिहीन!
अकरा गावांतील शेतकऱ्यांचा विकास आराखड्याविरोधात संताप: आरक्षणामुळे होणार भूमिहीन!pudhari
Published on
Updated on

खडकवासला : महापालिकेत 2017 मध्ये समावेश करण्यात आलेल्या धायरी, शिवणेसह 11 गावांच्या विकास आराखड्यात बहुतेक शेतकऱ्यांच्या जमिनींवर आरक्षणे टाकण्यात आली आहेत. त्यामुळे अनेक शेतकरी भूमिहीन, तर काही अल्पभूधारक होणार आहेत. बहुतेक गावांत गायरान, सरकार पडजमिनी आहेत. या जमिनींवर विकासकामांसाठी आरक्षणे टाकण्यात यावीत; अन्यथा तीव आंदोलन करण्याचा निर्धार सर्वपक्षीय हवेली तालुका नागरी कृती समितीने केला आहे.(Latest Pune News)

अकरा गावांतील शेतकऱ्यांचा विकास आराखड्याविरोधात संताप: आरक्षणामुळे होणार भूमिहीन!
Pune Nigdi Case Acquittal: पत्नीच्या मृत्यूप्रकरणात पतीची निर्दोष सुटका; आठ वर्षांनंतर न्यायालयाचा निकाल

अन्यायकारक आरक्षणे मागे घेतले जात नाही, तोपर्यंत तीव लढा देण्याचा पवित्रा कृती समितीने घेतला आहे. धायरी येथे रविवारी झालेल्या कृती समितीच्या बैठकीत शासनाच्या अन्यायकारक धोरणाचा निषेध करण्यात आला. कृती समितीचे अध्यक्ष श्रीरंग चव्हाण पाटील म्हणाले की, पीएमआरडीए ( पुणे महानगर विकास प्राधिकरण) या गावांचा विकास आराखडा मंजूर करणार होते. मात्र, त्यात गैरप्रकार झाल्याने शासनाने वरिष्ठ पातळीवर या गावांचा विकास आराखडा तयार केला आहे. त्यामध्ये एक गुंठ्यापासून दोन - तीन एकर जमिनींवर आरक्षणे टाकली आहे. यावर मुंबईत हरकती दाखल करण्यात येणार आहेत. पुण्यातील शेतकऱ्यांना हे गैरसोयीचे आहे. यामुळे पुण्यातील विभागीय आयुक्त कार्यालय किंवा जिल्हाधिकारी कार्यालयात हरकती दाखल करण्याची सोय करावी. या गावांत असलेल्या सरकारी जमिनींवर विकासकामे करण्यात यावी.

अकरा गावांतील शेतकऱ्यांचा विकास आराखड्याविरोधात संताप: आरक्षणामुळे होणार भूमिहीन!
Balbharati Paud Phata Road: बालभारती–पौड फाटा रस्त्याला गती; पुण्याच्या आयुक्तांचे प्रशासनाला महत्त्वाचे आदेश

कृती समितीचे उपाध्यक्ष पोपटराव खेडेकर म्हणाले की, नवीन कात्रज बाह्यवळण महामार्ग, राष्ट्रीय प्रकल्प, बंधारे आदी कामांसाठी या गावांतील शेतकऱ्यांच्या जमिनींचे संपादन केले आहे. नागरीकरण वाढल्याने बहुतांश शेतकऱ्यांकडे जमिनी शिल्लक नाहीत. ज्या शेतकऱ्यांकडे थोड्याफार जमिनी शिल्लक आहेत, त्यावरदेखील आरक्षणे टाकण्यात आली आहेत.

अकरा गावांतील शेतकऱ्यांचा विकास आराखड्याविरोधात संताप: आरक्षणामुळे होणार भूमिहीन!
Diwali Swarsandhya Pune: 'स्वरसंध्या' तून रसिकांनी अनुभवली सुरांची दिवाळी

अमर चिंधे पाटील म्हणाले, ‌‘शासनाने अन्यायकारकपणे विकास आराखडा तयार केला आहे. यानुसार समाविष्ठ गावांत आणि वाड्यावस्त्यांत मूळ गावठाण विस्तारालाही जागा उरणार नाही. त्यामुळे भूमिपुत्रांच्या घरांचा प्रश्न गंभीर होणार आहे.‌’ या वेळी मिलींद पोकळे, संदीप चव्हाण आदींसह नागरिक उपस्थित होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news