

पुणे : पत्नीचा गळा आवळून खून केल्याप्रकरणातील आरोपी पती रामबहाद्दूर जबान विश्वकर्मा यांची न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली. अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायाधीश ए. एल. टिकले यांच्या न्यायालयाने हा निकाल दिला. या प्रकरणात त्याच्यावतीने ॲड. पूजा अगरवाल, ॲड. प्रकाश चव्हाण आणि ॲड. अनिश चिपाडे यांनी बाजू मांडली. (Latest Pune News)
ॲड. प्रकाश चव्हाण यांनी घेतलेल्या साक्षीदारांच्या उलट तपासादरम्यान जबाबात आणलेल्या विसंगती, वैद्यकीय पुराव्यातील तफावती, खुनाचा उद्देश सिद्ध न होणे आणि पोलिसांनी तपासादरम्यान केलेला निष्काळजीपणा या सर्व गोष्टी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिल्या.
अंतिम युक्तिवादाच्या दरम्यान ॲड. अगरवाल यांनी दिलेले सर्वोच्च न्यायालयाचे न्यायनिवाडे तसेच गुन्ह्यामध्ये आरोपीला कशाप्रकारे चुकीच्या पद्धतीने आरोपीला अडकविण्याची बाब न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिली. 2 मार्च 2017 रोजी निगडी येथे घडलेल्या घटनेप्रकरणी विश्वकर्मा याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता.