Hadapsar Shooting Range: हडपसरमधील कोट्यवधींची शूटिंग रेंज बंद; नेमबाज खेळाडूंचे भविष्य टांगणीला!

४ ते ५ कोटी रुपये खर्चून उभारलेल्या क्रीडा संकुलाची दुरवस्था; रेंज तातडीने सुरू करण्याची अमोल तुपे यांची मागणी
Shooting Range
Shooting RangePudhari
Published on: 
Updated on: 

पुणे: पुणे महानगरपालिकेने हडपसर येथे कोट्यवधी रुपये खर्च करून उभारलेली ऑलिम्पिक दर्जाची शूटिंग रेंज सध्या बंद अवस्थेत असून, या रेंजची दुरवस्था झाल्याने हजारो होतकरू नेमबाज खेळाडूंचे भविष्य टांगणीला लागले आहे. ही रेंज तातडीने दुरुस्‍त करून सुरू करावी, अशी मागणी क्रांती शेतकरी संघाचे संस्थापक व अध्यक्ष अमोल तुपे यांनी केली आहे.

Shooting Range
Pune Rangyatra App: पुणे महापालिकेचे ‘रंगयात्रा’ ॲप बंद; नाट्यगृहांच्या तारखांसाठी पुन्हा जुनी पद्धत!

बालेवाडीनंतर महाराष्ट्रातील मोठ्या शूटिंग रेंजपैकी एक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या क्रीडा संकुलाकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. महापालिकेच्या माध्यमातून अंदाजे ४ ते ५ कोटी रुपये खर्च करून १० मीटर, २५ मीटर आणि ५० मीटर क्षमतेची आधुनिक शूटिंग रेंज उभारण्यात आली होती.

Shooting Range
Pune Nagar Road Traffic: नगर रस्त्यावर वाहतूक कोंडीचा विळखा; येरवड्यापासून खराडीपर्यंत प्रवास जीवघेणा!

सुरुवातीच्या काळात या रेंजचे कामकाज सुरळीत सुरू होते. मात्र, २०१९-२०२० मध्ये टेंडरची मुदत संपल्यानंतर नवीन निविदा प्रक्रिया रखडली आणि ही रेंज बंद पडली आहे. रेंज बंद असताना येथे पुरेशी सुरक्षा व्यवस्था नसल्यामुळे मौल्यवान साहित्याची चोरी आणि नासधूस झाल्याचा आरोपही तुपे यांनी यावेळी केला.

Shooting Range
Bhagwan Birsa Munda Jalyukt Shivar Abhiyan: आदिवासी शेतकऱ्यांसाठी स्वतंत्र ‘भगवान बिरसा मुंडा जलयुक्त शिवार अभियान’; राज्य सरकारची तत्त्वतः मान्यता

या शूटिंग रेंजमध्ये पुणे शहरासह पूर्व हवेली आणि ग्रामीण भागातील शेतकरी, कामगार तसेच सर्वसामान्य कुटुंबातील खेळाडू सराव करत होते. मात्र, रेंज बंद झाल्याने या खेळाडूंना सरावासाठी बालेवाडी येथे जावे लागत आहे.

Shooting Range
Pune Bharat Taxi: पुणेकरांसाठी ‘भारत टॅक्सी’ सेवा १५ नोव्हेंबरपासून; ५० हजारांहून अधिक कॅब-रिक्षाचालकांची नोंदणी

एक ते दोन तासांचा प्रवास, वाढता आर्थिक खर्च आणि शाळा-महाविद्यालयांचे वेळापत्रक यामुळे अनेक खेळाडूंना अडचणींचा सामना करावा लागत आहे. रेंजची तत्काळ दुरुस्ती, पारदर्शक पद्धतीने नवीन टेंडर प्रक्रिया, २४ तास सुरक्षा व्यवस्था, सीसीटीव्ही कॅमेरे, अनुभवी प्रशिक्षकांची नियुक्ती, आधुनिक इलेक्ट्रॉनिक टार्गेट सिस्टिम आणि आवश्यक साहित्य उपलब्ध करून देण्याची मागणी तुपे यांनी केली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.