Pune Bharat Taxi: पुणेकरांसाठी ‘भारत टॅक्सी’ सेवा १५ नोव्हेंबरपासून; ५० हजारांहून अधिक कॅब-रिक्षाचालकांची नोंदणी

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते तळेगाव दाभाडे येथे शुभारंभ; सहकार तत्त्वावरील सेवेत प्रवाशांना निश्चित भाडेदर, चालकांना योग्य मोबदल्याचा दावा
Bharat Taxi
Bharat TaxiPudhari
Published on: 
Updated on: 

पुणे: सहकार तत्त्वावर आधारित ‘भारत टॅक्सी’ हा अभिनव उपक्रम पुणेकरांच्या सेवेसाठी सज्ज झाला आहे. रविवारी (दि. १५ नोव्हेंबर) तळेगाव दाभाडे येथील नॅशनल हेवी इंजिनिअरिंग कोऑपरेटिव्ह लिमिटेड (एनएचईसीएल) येथे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते या बहुप्रतीक्षित सेवेचा शुभारंभ होणार आहे. या सोहळ्याला मुख्यमंत्री तसेच केंद्रीय सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.

Bharat Taxi
Maharashtra Milk Price Hike: दूध महागणार! गाय आणि म्हशीच्या दुधाच्या दरात प्रतिलिटर चार रुपयांची वाढ

गेल्या अनेक वर्षांपासून खासगी कंपन्यांकडून प्रवाशांची आर्थिक लूट होत असून, सर्ज प्राइसिंगच्या नावाखाली अतिरिक्त भाडे आकारले जात आहे. तसेच चालकांच्या कमाईतूनही मोठ्या प्रमाणात कमिशन कपात करून त्यांचे आर्थिक शोषण केले जाते. या पार्श्वभूमीवर भारत टॅक्सी प्रवासी आणि चालक या दोन्ही घटकांसाठी वरदान ठरणार आहे, अशी माहिती महाराष्ट्र कामगार सभेचे अध्यक्ष डॉ. केशव क्षीरसागर यांनी दिली.

Bharat Taxi
Pune Cleanliness Survey Ranking: स्वच्छ सर्वेक्षणात पुण्याची घसरण; आठव्या स्थानावरून थेट बाराव्या क्रमांकावर, महापालिकेच्या कारभारावर प्रश्नचिन्ह

पुण्यात ५० हजारांहून अधिक कॅब आणि रिक्षाचालकांची नोंद

सध्या पुणे शहरातच ५० हजारांहून अधिक कॅब व रिक्षाचालकांनी या प्लॅटफॉर्मवर आपली नोंदणी केली असून, ते ग्राहकांना उत्तम सेवा देण्यासाठी सज्ज आहेत. पारदर्शक कारभार, परवडणारे दर आणि चालकांना त्यांच्या मेहनतीचा योग्य मोबदला यामुळे या सेवेला नागरिकांचा अभूतपूर्व प्रतिसाद मिळणार आहे. हा फक्त एक वाहतूक पर्याय नसून वाहतूक क्षेत्रात आर्थिक लोकशाही प्रस्थापित करण्याचे हे एक ऐतिहासिक पाऊल आहे, असेही क्षीरसागर यांनी दै. ‘पुढारी’शी बोलताना सांगितले.

Bharat Taxi
Pune Municipal Corporation Fund Diversion: पुणे महापालिकेच्या निधी पळवापळवीला आयुक्तांचा चाप; एका प्रभागाचा निधी दुसरीकडे वळवण्यास बंदी

सध्याच्या खासगी ॲग्रीगेटर कंपन्यांच्या मनमानीला आणि आर्थिक शोषणाला आळा घालण्यासाठी आम्ही ‘भारत टॅक्सी’ हा सहकार तत्त्वावरील पर्याय आणला आहे. हे ॲप गुगल प्ले स्टोअरवर उपलब्ध असून, प्रवाशांसाठी आणि चालकांसाठी स्वतंत्र ॲप असणार आहे. आतापर्यंत ५० हजारांहून अधिक जणांची यावर नोंदणी झाली असून आम्ही अवघ्या १ रुपयामध्ये या संदर्भातील करार केला आहे. येत्या १५ तारखेला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते तळेगाव येथे या सेवेचा अधिकृत शुभारंभ होणार असून, याद्वारे प्रवाशांना पारदर्शक सेवा आणि चालकांना सन्मानजनक उत्पन्न मिळेल. महत्त्वाचे म्हणजे पाऊस वारा काहीही असो या ॲपवरील भाडेदर फिक्स असणार आहेत.

डॉ. केशव नाना क्षीरसागर, अध्यक्ष, महाराष्ट्र कामगार सभा

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.