Hadapsar Ward election result: हडपसर-सातववाडीत तिसऱ्या पॅनेलचा फटका; राष्ट्रवादीचे वर्चस्व ढासळले, उबाठाची एंट्री
प्रमोद गिरी
हडपसर : हडपसर- सातववाडी प्रभाग क्रमांक 16 मध्ये राष्ट्रवादी काँग््रेास पक्षाचे व भारतीय जनता पक्षाचे समान उमेदवार गेल्या पंचवार्षिकला होते. मात्र, पुणे महापालिकेच्या 2026 च्या सर्वत्रिक निवडणुकीत तिसरे पॅनेल उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनाही उतरल्यामुळे एकूण तीन पॅनेल झाले. या पालिकेच्या निवडणुकीत ज्या उमेदवाराची निवडून यायची खात्री होती, त्यांना पराभव स्वीकारावा लागला. भाजपला दोन जागांवर पूर्वीसारखेच समाधान मानावे लागले, तर राष्ट्रवादी काँग््रेासची एकच महिला निवडून आली, तर काळेपडळमधून उबाठा शिवसेनेचे एकच नगरसेवक निवडून आले.
या प्रभागावर भाजप आणि राष्ट्रवादीचे वर्चस्व आहे. मात्र, राष्ट्रवादीला वर्चस्व टिकवता आले नाही. त्यामुळे राष्ट्रवादी पक्षाचे वर्चस्व कमी झाल्याचे दिसून आले. यामुळे शिवसेना ठाकरे गट जिवंत असल्याने एक उमेदवार निवडून आला. ठाकरे गटाने निवडून येताच जल्लोष केला.
हडपसर- सातववाडी या प्रभागातून ’अ’ गटातून राष्ट्रवादी काँग््रेासच्या उमेदवार वैशाली बनकर यांना 13,979 मते पडली. प्रतिस्पर्धी उबाठाच्या पल्लवी सुरसे यांना 13,571 मते मिळाली, त्यामुळे त्यांचा कमी मतांनी पराभव झाला.
भाजपच्या शिल्पा होले तिसऱ्या क्रमांकावर राहिल्या. ’ब’ गटातून भाजपच्या उज्ज्वला जंगले यांनी 16,310 मते घेऊन उबाठाच्या उमेदवार नलिनी मोरे यांचा पराभव केला. ’क’मधून उबाठाचे नितीन गावडे यांना 14,083 मते मिळून भाजपचे संदीप दळवी यांचा निसटता पराभव झाला. ’ड’मधून भाजपचे मारुती आबा तुपे यांना 19,889 मती मिळाली. त्यांनी राष्ट्रवादी काँग््रेासचे योगेश ससाणे यांचा पराभव केला. हडपसर- सातववाडी या प्रभागावर राष्ट्रवादी काँग््रेास आणि भाजपचे वर्चस्व होते. त्यात भाजपला दोन जागांवर समाधान मानावे लागले. मात्र, राष्ट्रवादीला एकच मिळाले. त्यांचे नुकसान झाले. या वेळी उमेदवारी देताना राष्ट्रवादी पक्षातून अनुभव न पाहता तरुणांना संधी दिली. याचा फटका राष्ट्रवादी पक्षाला जोरदार बसला. त्यातच ’ड’ ओपनमधून भाजपचे मारुती आबा तुपे यांच्याविरोधात राष्ट्रवादी काँग््रेासचे योगेश ससाणे यांच्यात लढत होती. ही लढत जातिव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून महत्त्वाची मानली जाते. मात्र, या निवडणुकीत ससाणे यांचा दारुण पराभव झाला.
’अ’मधून राष्ट्रवादीच्या वैशाली बनकर यांना विजय होण्यासाठी संघर्षाची वाट पाहावी लागली. उबाठा शिवसेनेच्या उमेदवार पल्लवी सुरसे यांचा कमी मतांनी पराभव झाला. ’ब’मधून भाजपच्या उज्ज्वला जंगले यांनी आपल्या भागात वर्चस्व ठेवल्याने प्रतिस्पर्धी उबाठाचे नलिनी मोरे यांना पराभव स्वीकारावा लागला. ’क’मधून उबाठाचे नितीन गावडे यांनी भाजपचे संदीप दळवी यांचा कमी मतांनी पराभव केला. ’क’मध्ये एकाच समाजातील उमेदवारांना दोन पक्षांनी प्रतिनिधित्व दिल्याने मतांची विभागणी झाली. त्यामुळे उबाठाचे नितीन गावडे यांचा विजय झाला. शिवसेना ठाकरे गटाचे एकमेव पुणे शहरात नितीन गावडे विजय झाल्याने ते वैशिष्ट्यपूर्ण म्हणून त्यांची एक वेगळी ओळख निर्माण झाली.
मत विभागणीमुळे गावडेंचा विजय
हडपसर- सातववाडी प्रभाग क्रमांक 16 मध्ये पुणे- सोलापूर रोड- लक्ष्मी कॉलनी-15 नंबर हा भाग समाविष्ट होता. या भागातील वाहतूक कोंडी, पिण्याचे पाणी व कचरा समस्या, त्याचबरोबर नागरिकांना सुविधा देण्यास कमी पडल्यामुळे विद्यमान नगरसेवकांना निवडून येण्यासाठी झटावे लागले. त्याचबरोबर माळी समाजातील मतांची विभागणी झाल्यामुळे या ठिकाणी ठाकरे गटाचे गावडे यांचा संघर्षातून विजय झाला, हे पुण्यातील एकमेव निवडून आलेले उमेदवार आहेत.

