Municipal Procurement Scam: महापालिकेत दोन कोटींच्या साहित्यखरेदीत घोटाळा; 20 अधिकारी-कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटिसा

नऊ वर्षे गोदामात पडून राहिले साहित्य; निवृत्त अधिकाऱ्यांचाही समावेश, फेब्रुवारीअखेर कारवाईची शक्यता
Pune Municipal Corporation
Pune Municipal CorporationPudhari
Published on
Updated on

पुणे : महापालिकेत दोन कोटी रुपयांच्या साहित्यखरेदी प्रकरणात गंभीर अनियमितता उघड झाल्यानंतर प्रशासनाने संबंधितांवर कारवाईची प्रक्रिया सुरू केली आहे. वर्षानुवर्षे विनावापर गोदामात पडून राहिलेल्या साहित्यामुळे महापालिकेच्या निधीची अपव्यय झाल्याचे निष्पन्न झाल्याने भांडार, घनकचरा व्यवस्थापन आणि लेखा-वित्त विभागातील 20 अधिकारी व कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. यामध्ये काही निवृत्त अधिकाऱ्यांचाही समावेश असल्याने खळबळ उडाली आहे.

Pune Municipal Corporation
Bhigwan Bird Census: भिगवण पक्षीगणनेत 6,604 पक्ष्यांची नोंद; वाढलेल्या पाण्यामुळे फ्लेमिंगो यंदा गायब

काही महिन्यांपूर्वी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने हा प्रकार उघडकीस आणला होता. मनसेचे सरचिटणीस हेमंत संभूस यांनी संबंधित विभागांनी ठेकेदारांची बिले काढण्यासाठी घाई केली. मात्र, साहित्याचा वापर न झाल्याने सुमारे दोन कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा आरोप केला होता. त्यानंतर आयुक्त नवल किशोर राम यांनी चौकशीचे आदेश दिले होते.

हेमंत संभूस यांनी केलेल्या आरोपानुसार, भांडार विभागाने सन 2015 मध्ये चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांसाठी सुमारे 75 लाख रुपयांचे गणवेशाचे कापड तसेच 69.71 लाख रुपयांच्या साड्या खरेदी केल्या होत्या.

संबंधित ठेकेदारांना देयके अदा करण्यात आली. मात्र, हे साहित्य गेल्या नऊ वर्षांपासून वडगाव बुद्रूक येथील सावित्रीबाई फुले अभ्यासिकेत पडून आहे. एकाही कर्मचाऱ्याला ते वितरित केले नाही. साहित्याचा वापर झाला नसतानाही ठेकेदारांची बिले वेळेत अदा केल्याने खरेदी प्रक्रियेवर संभूस यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते.

Pune Municipal Corporation
Mumbai Pune Expressway: द्रुतगती महामार्गावरील कोंडीबाबत प्रशासनाची कबुली; काही त्रुटी राहिल्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे मान्य

या प्रकरणाचा अतिरिक्त आयुक्त ओमप्रकाश दिवटे यांनी सविस्तर चौकशी करून अहवाल सादर केला आहे. त्यानुसार संबंधित विभागांतील तत्कालीन प्रमुखांसह विविध पदांवरील अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावल्या आहेत. यामध्ये निवृत्त मुख्य अभियंता, सध्या कार्यरत असलेले उपायुक्त, लिपिक आणि कनिष्ठ अभियंता अशा विविध पदांवरील सुमारे 20 जणांचा समावेश आहे. पुढील कारवाई फेबुवारी अखेरपर्यंत अपेक्षित असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.

Pune Municipal Corporation
SPPU UPSC MPSC Free Coaching: पुणे विद्यापीठाच्या मोफत UPSC-MPSC प्रशिक्षण प्रवेश परीक्षेची तारीख जाहीर

कचऱ्याची दुर्गंधी कमी करणारे साहित्यही धूळ खात

घनकचरा विभागाच्या मागणीनुसार ऑगस्ट 2023 मध्ये 50 लाख रुपये खर्चून 20 हजार किलो ‌’सिटी वेस्ट ट्रीटमेंट‌’ पावडर आणि 4 हजार लिटर ‌’इकोचीप‌’ लिक्विड बायोकॅटॅलिस्ट खरेदी करण्यात आले. कचऱ्याची दुर्गंधी कमी करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या या साहित्याचा योग्य वेळी वापर न झाल्याने त्यातील रासायनिक घटक निष्प्रभ झाले असून, ते आता निरुपयोगी ठरले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news