राज्यातील ‘धर्मादाय’मधील राखीव खाटांवर शासनाचे नियंत्रण

राज्यातील ‘धर्मादाय’मधील राखीव खाटांवर शासनाचे नियंत्रण
Published on
Updated on

पुणे; पुढारी वृत्तसेवा : राज्यातील धर्मादाय रुग्णालयांमधील आरक्षित खाटा गरीब आणि निर्धन रुग्णांसाठी राखीव ठेवल्या जातात. खाटांची माहिती पारदर्शक पध्दतीने उपलब्ध करून देण्यासाठी स्वतंत्र ऑनलाइन प्रणाली विकसित करण्याचा निर्णय शासनातर्फे घेण्यात आला आहे. याबाबतचे वृत्त दै. 'पुढारी'ने 29 जून रोजी प्रसिध्द केले होते. धर्मादाय रुग्णालयांकडून बरेचदा गरजू रुग्णांना खाटा उपलब्ध नसल्याचे कारण दिले जाते. रुग्णालयांच्या मनमानीला आळा घालण्यासाठी आरोग्य विभागातर्फे ऑनलाइन अ‍ॅप्लिकेशन तयार करण्यात येत आहे. त्यामुळे खाटांची उपलब्धता ऑनलाइन समजू शकणार आहे.

यासाठी विशेष समिती स्थापन करण्याचा निर्णय वैद्यकीय शिक्षण आणि औषधी द्रव्य विभागातर्फे घेण्यात आला आहे. याबाबतचे परिपत्रक 5 जुलै रोजी काढण्यात आले आहे. बेडचे वाटप कागदपत्रांची पडताळणी करून ऑनलाइन पद्धतीने करण्यात येणार आहे. ऑनलाईन प्रणाली विकसित करण्यासाठी नेमलेल्या समितीचे वैद्यकीय शिक्षण आयुक्त हे अध्यक्ष असतील. याशिवाय, विविध विभागांमधील 6 सदस्यांचा समावेश असणार आहे. समितीसह राज्यस्तरावर विशेष मदत कक्ष सुरू करण्यात येणार आहे. रुग्णालयांकडून लूट होऊ नये, यासाठी ऑनलाईन अ‍ॅप्लिकेशन तयार केले जात असल्याची माहिती राज्याचे आरोग्यमंत्री प्रा. डॉ. तानाजी सावंत यांनी दिली.

गेले काही दिवस आरोग्य चळवळीत कार्यकर्त्यांकडून याबाबत सुधारणा होण्यासाठी जनहित याचिका, माहिती अधिकार व अर्ज-निवेदने याद्वारे सतत पाठपुरावा केला जात होता. त्या पाठपुराव्याला यश येण्याची आशा शासनाच्या परिपत्रकामुळे निर्माण झाली आहे. अनेक वर्षांपासून हिरावलेला आर्थिक दुर्बल रुग्णांचा आरोग्याचा हक्क त्यांना परत मिळू शकेल अशी शक्यता निर्माण झाली आहे.

– दीपक जाधव, आरोग्य हक्क कार्यकर्ता, पुणे

हेही वाचा

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news