Gopichand Padalkar News : हे गणराया, गोपिचंद पडळकर यांना सद्बुद्धी दे..!

MLA Gopichand Padalkar
MLA Gopichand Padalkar
Published on
Updated on

वडगाव मावळ : हे गणराया.. गोपीचंद पडळकर यांना सद्बुद्धी दे ! असे साकडे घालत पडळकरांनी बडबड करण्यापेक्षा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या कर्तृत्वाचे अनुकरण करून विकासाची स्पर्धा करावी, अशी प्रार्थना वडगावमधील जय बजरंग तालीम मंडळाच्या मानाच्या गणपतीला करत राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष गणेश खांडगे यांच्यासह पदाधिकार्‍यांनी अनोखे आंदोलन केले.

खांडगे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष साहेब कारके, जिल्हा युवक अध्यक्ष सचिन घोटकुले, तालुका युवक अध्यक्ष किशोर सातकर, उपाध्यक्ष चंद्रकांत दाभाडे, संदीप आंद्रे, विकी लोखंडे, पंढरीनाथ ढोरे, माजी नगरसेवक सुनील ढोरे, शहराध्यक्ष प्रवीण ढोरे, सुनील दाभाडे, सुहास गरुड, नारायण ठाकर, प्रशांत भागवत, भानुदास जांभुळकर आदी पदाधिकारी उपस्थित होते.

गोपीचंद पडळकर हे निवडणुकीत पराभूत झाल्याने त्यांचे मानसिक संतुलन बिघडले आहे. ते सातत्याने उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर खालच्या पातळीवर जाऊन टीका करीत आहेत. त्यांनी स्वतःचा आवाका पाहून टीका टिप्पणी करावी, अजित पवार यांच्या कामाची सुरुवात सकाळच्या रामप्रहरी होते. तसेच ते विकासकामात मग्न असतात, मात्र गोपीचंद पडळकर यांच्यासारखे वाचाळवीर राज्याने पाहिला आहे, असा टोला गणेश खांडगे यांनी लगावला.

हेही वाचा

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news