परदेशात नावाजलेली स्टॅच्यू मॅन ही कलाकारी तो पुण्यात येऊन सादर करीत आहे. विविध देशांमध्ये स्टॅच्यू मॅन ही कलाकारी खूप प्रसिद्ध आहे. खासकरून अमेरिका, युरोपियन देशांमध्ये रस्त्यांवर कलाकार विविध पेहरावात स्टॅच्यू मॅन बनून बराच वेळ स्तब्ध उभे राहतात, मूळचा नगर येथील नेवासा येथील असलेल्या 21 वर्षीय सिद्धार्थने ही कला यु-ट्यूब चॅनेल्सवरील व्हिडीओ पाहून आत्मसात केली असून, एक माणूस असा स्टॅच्यू (पुतळा) बनून अर्धा ते एक तास उभा राहतो, हे पाहून अनेक जण आश्चर्यचकित होतात, कुतूहलापोटी त्याच्याशी अनेक जण संवादही साधतात आणि या कलेबद्दल जाणून घेतात.