आले, लसूण अद्यापही शंभरी पार; टोमॅटोचे दर आवाक्यात

आले, लसूण अद्यापही शंभरी पार; टोमॅटोचे दर आवाक्यात

पिंपरी(पुणे); पुढारी वृत्तसेवा : शहरातील भाजी मंडईमध्ये पावटा, घेवडा, टोमॅटोचे दर आता आवाक्यात आले आहेत. पालेभाज्यांच्या दरातही घट झाली आहे; मात्र आले, लसणाचे दर अद्यापही चढेच असून, ते शंभरी पार आहेत. तर कांद्याचेही दर वाढतील, अशी माहिती पिंपरीतील विक्रेते स्वप्निल गायकवाड यांनी दिली. शहरातील मोशी उपबाजार, चिंचवड, आकुर्डी तसेच पिंपरी येथील लाल बहादूर शास्त्री भाजी मंडईमधील किरकोळ बाजारात 200 ते 220 रूपये प्रतिकिलो दराने विक्री होत असलेला पावटा, घेवडा, टोमॅटो व मटार आता 50 ते 60 प्रतिकिलो दराने विक्री होत आहे. तर मेथी, पालक, कोथंबिरीच्या जुडीची विक्री दहा रूपयाने होत आहे. मात्र आले, लसणाचे दर अद्यापही शंभरीपार आहेत.

मोशी उपबाजारातील आवक : (क्विंटल)

लसूण 5, आले 26, टोमॅटो 296, हिरवी मिरची 116, कोबी 173, कांदा 441, बटाटा 977, भेंडी 79, कारली 48, शेवगा 14 क्विंटल एवढी आवक झाली आहे.

घाऊक बाजारातील प्रतिकिलो दर

आले 90, लसूण 110, हिरवी मिरची 25 ते 30, कोबी 10 ते 12, टोमॅटो 15 ते 20, कांदा 15 ते 20, बटाटा 12 ते 17, भेंडी 25 ते 30, मटार 40 रूपये दराने विक्री होत आहे.
मोशी उपबाजारात पालेभाज्यांच्या एकूण 42800 गड्डी, फळे 319 क्विंटल आणि फळ भाज्यांची आवक 3133 क्विंटल एवढी आवक झाली.

पिंपरी मंडईतील पालेभाज्यांचे किरकोळ भाव

पालेभाज्या दर (प्रति जुडी)
मेथी 10
कोथिंबीर 15
कांदापात 20
शेपू 10
पुदिना 10
मुळा 10
चुका 10
पालक 10

फळभाज्यांचे किलोचे भाव
कांदा 25 ते 40
बटाटा 30
आले 150 ते 170
लसुन 150 ते 170
भेंडी 60
टोमॅटो 40 ते 50
सुरती गवार 70 ते 80
गावरान गवार 100 ते 110
दोडका 60
दुधी भोपळा 60
लाल भोपळा 60 ते 70

कारली 60
वांगी 60
भरीताची वांगी 70
तोंडली 50
पडवळ 60
फ्लॉवर 50 ते 60
कोबी 30 ते 40
काकडी 20 ते 30
शिमला 60 ते 70
शेवगा 60 ते 70
हिरवी मिरची 50 ते

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news