Maha E-Seva Kendra Pune: गणेश बिडकर यांच्या महा ई-सेवा केंद्रातून २७ हजारांहून अधिक नागरिकांना लाभ

प्रशासनाच्या योजना थेट जनतेपर्यंत; ‘घरटी किमान एक लाभार्थी’ अशी स्थिती
गणेश बिडकर यांनी सुरू केलेल्या ई-महासेवा केंद्रातील सुविधांचा लाभ घेताना नागरिक.
गणेश बिडकर यांनी सुरू केलेल्या ई-महासेवा केंद्रातील सुविधांचा लाभ घेताना नागरिक.Pudhari
Published on
Updated on

पुणे : जनतेच्या मदतीसाठी सदैव कार्यरत असणाऱ्या गणेश बिडकर यांनी त्यांच्या प्रभागात सुरू केलेल्या महा ई-सेवा केंद्राचा लाभ आजवर २७,००० नागरिकांना झाला असल्याची माहिती बिडकर यांच्या प्रचारयंत्रणेतील कार्यकर्त्यांनी दिली. घरटी किमान एक लाभार्थी असल्याने बिडकर यांच्या जनसंपर्क मोहिमेदरम्यान जवळपास प्रत्येक जण त्यांचे आभार मानताना पाहायला मिळत आहे.

गणेश बिडकर यांनी सुरू केलेल्या ई-महासेवा केंद्रातील सुविधांचा लाभ घेताना नागरिक.
Illegal Liquor Racket Pune: मद्याच्या बेकायदेशीर वाहतूक-साठवणूक रॅकेटचा पर्दाफाश; जिल्हा व पिंपरीत धडक कारवाई

पुणे महापालिकेसह केंद्राच्या विविध योजनांचा लाभ नागरिकांना मिळावा, विविध शासकीय कागदपत्रे मिळावीत, यासाठी बिडकर यांच्या पुढाकाराने सोमवार व रास्ता पेठ येथे महा ई-सेवा केंद्रे सुरू केली गेली. या ई-सेवा केंद्रात उत्पन्नाचा दाखला, रहिवासी दाखला, ज्येष्ठ नागरिक ओळखपत्र, रेशन कार्ड, जातीचा दाखला यांसारखी कागदपत्रे नागरिकांना विनामूल्य उपलब्ध करून दिली जातात.

गणेश बिडकर यांनी सुरू केलेल्या ई-महासेवा केंद्रातील सुविधांचा लाभ घेताना नागरिक.
NCP alliance PMC Election: महापालिका निवडणुकीत दोन्ही राष्ट्रवादी एकत्रच लढणार

नागरिकांना या सुविधा पुरवण्याचे विशेष प्रशिक्षण 'टीम बिडकर'ला देण्यात आले आहे. या ई-सेवा केंद्राच्या माध्यमातून आतापर्यंत ७ हजार दाखले, ४ हजार १७४ आधार कार्ड, ४ हजार शहरी गरीब कार्ड, ४ हजार ४२९ मतदान ओळखपत्र, १ हजार ८०० ई-श्रम कार्डचे वितरण करण्यात आले आहे. या ई-सेवा केंद्रामुळे विविध सरकारी योजनांची माहिती एकाच ठिकाणी मिळते. प्रशासन आणि सर्वसामान्य यांना जोडणाऱ्या दुव्याचे काम हे महा ई-सेवा केंद्र करत आहे. या केंद्राचा लाभ अधिकाधिक नागरिकांना घ्यावा, असे आवाहन गणेश बिडकर यांनी केले आहे.

गणेश बिडकर यांनी सुरू केलेल्या ई-महासेवा केंद्रातील सुविधांचा लाभ घेताना नागरिक.
Pune Municipal Election: चौकात सभा घ्यायचीय? तर मोजा आठ हजार रुपये!

गणेश बिडकर यांच्या महा ई-सेवा केंद्राचे लाभार्थी

एकूण लाभार्थी – २७,०००+

दाखले – ७,०००

आधार कार्ड – ४,१७४

शहरी गरीब कार्ड – ४,०००

मतदान ओळखपत्र – ४,४२९

ई-श्रम कार्ड – १,८००

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news