Illegal Liquor Racket Pune: मद्याच्या बेकायदेशीर वाहतूक-साठवणूक रॅकेटचा पर्दाफाश; जिल्हा व पिंपरीत धडक कारवाई

उत्पादन शुल्क विभागाकडून दोघांना अटक; १५ लाखांहून अधिक किमतीचा मुद्देमाल जप्त
Illegal Liquor Sale
Illegal Liquor SalePudhari
Published on
Updated on

पुणे : गोवानिर्मित महाराष्ट्रात विक्रीस प्रतिबंधित असलेल्या विदेशी मद्याची बेकायदेशीर वाहतूक व साठवणूक करणार्‍या रॅकेटचा राज्य उत्पादन शुल्क (एक्साईज) विभागाच्या पथकाने पर्दाफाश केला. कॅम्प, भवानी पेठ भागात केलेल्या या कारवाईत उच्चप्रतिची स्कॉच, विविध ब्रँडच्या बाटल्या, कारसह एकूण ८ लाख ६९९ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. तर, दोघांना अटक केली आहे.

Illegal Liquor Sale
Pune Municipal Election: चौकात सभा घ्यायचीय? तर मोजा आठ हजार रुपये!

राजेश भजनलाल बसंतानी (वय ५२, रा. भवानी पेठ, पुणे), प्रकाश भजनलाल बसंतानी (रा. भवानी पेठ, पुणे) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. त्यांच्याकडून विविध ब्रॅंडच्या महागड्या दारूच्या बाटल्या जप्त केल्या आहेत. उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक अतुल कानडे यांच्या मार्गदर्शनात पथक हद्दीत गस्तीवर होते. त्यादरम्यान कॅम्पमधील बाबाजान चौक, कमानीजवळ संशयित वाहनाची तपासणी केली असता त्यामध्ये विविध विदेशी मद्याच्या सीलबंद बाटल्या आढळून आल्या.

Illegal Liquor Sale
Ashok Haranwal Pune: पुण्यात उद्धव ठाकरे गटाला धक्का; माजी नगरसेवक अशोक हरणावळ अजित पवार गटात दाखल

पथकाने येथून राजेश बसंतानी याला अटक करून ४ लाख ९३ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. त्यानंतर भवानी पेठ येथील राहत्या घरी छापा टाकला. येथेही पथकाने विविध ब्रँडच्या सीलबंद विदेशी मद्याच्या बाटल्या सापडल्या. या कारवाईत प्रकाश बसंतानी याला अटक करून २ लाख ९७ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या गुन्ह्यात एकूण ३२ ब्रँडच्या विदेशी मद्याच्या बाटल्या तसेच चारचाकी वाहन असा एकूण ८ लाख ६९९ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक अतुल कानडे, उपअधीक्षक सुजित पाटील, संतोष जगदाळे यांच्या मार्गदर्शनात निरीक्षक वसंत कौसडीकर, दुय्यम निरीक्षक रोहित माने, जवान हितेश पवार, पूजा किरतकुडवे, जान्हवी शेडगे, श्रीधर टाकळकर यांच्यासह पथकाने ही कारवाई केली.

Illegal Liquor Sale
Adv Nilesh Nidhalakar: भ्रष्टाचारमुक्त भारताच्या ध्येयाला भाजपकडून तिलांजली; नवा पक्ष स्थापन

...दारू बनविण्यासाठीचे साहित्य जप्त

हिंजवडी-वाकड परिसरात राज्य उत्पादन शुल्क विभागाने बनावट विदेशी स्कॉच दारूच्या रॅकेटवर मोठी कारवाई केली. सापळा रचून चारचाकी व दुचाकीतून वाहतूक होत असलेली बनावट व्हिस्की जप्त करत दोघा आरोपींना अटक करण्यात आली. पुढील तपासात घरझडतीदरम्यान रिकाम्या बाटल्या, बनावट लेबल, बुचे व इतर साहित्य सापडले. निरीक्षक शैलेश शिंदे यांच्या पथकाने केलेल्या या कारवाईत वाहनांसह सुमारे ७ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news