पासलकर स्मारकासाठी निधी देणार : अजित पवार

पासलकर स्मारकासाठी निधी देणार : अजित पवार

खडकवासला : पुढारी वृत्तसेवा : सिंहगड रस्त्यावरील राजाराम पुलाजवळील हिंदवी स्वराज्याचे सरसेनापती वीर बाजी पासलकर स्मारकात महापालिकेने उभारलेल्या स्वराज्य संस्कार समूहशिल्पाचे उद्घाटन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते नुकतेच करण्यात आले. पासलकर स्मारकाच्या विकासासाठी निधी देण्यात येणार असल्याचे पवार यांनी या वेळी सांगितले. वीर बाजी पासलकर यांच्या जीवनावरील कादंबरीच्या दुसर्‍या आवृत्तीचे आणि वीर बाजी पासलकर प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजाभाऊ पासलकर यांच्या 'जीवनप्रवास खुण गाठ' या पुस्तकाचे प्रकाशनही या वेळी करण्यात आले.

ज्येष्ठ साहित्यिक श्रीपाल सबनीस, इतिहास संशोधक श्रीमंत कोकाटे, पुणे जिल्हा दूध संघाचे अध्यक्ष भगवान पासलकर, माजी नगरसेविका वैजयंतीराजे पासलकर, माजी महापौर दत्तात्रय धनकवडे, राजेंद्र शिळीमकर, विष्णुपंत पासलकर, सचिन पायगुडे, संजय पासलकर, लालूआण्णा पासलकर, परशुराम पासलकर आदींसह महापालिकेचे अधिकारी उपस्थित होते.

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news